✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागभीड(दि.21फेब्रुवारी):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. अविनाशभाऊ वारजूकर यांच्या अध्यक्षते खाली नागभीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. सतीशभाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वा *”काँग्रेस कार्यकर्ता मेळावा” व “हात से हात जोडो”* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या मेळाव्याची सुरुवात दिप प्रज्वलन व थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी मंचावर उपस्थितीत नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, चिमुर तालुका अध्यक्ष विजयजी गावंडे, नागभीड शहरअध्यक्ष डाँ.रविंद्रजी कावळे,काँग्रेस जेष्ठ नेते डाँ.प्रा.मोहनजी जगनाडे, डाँ. प्रा. अमिरजी धम्मानी, नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे सचिव दिलीपभाऊ मानापुरे, संजय गांधी निराधार समितीचे मा. ता.अध्यक्ष विनोदजी बोरकर, महिला तालुका अध्यक्ष ज्योत्सनाताई वारजूकर,माजी जि. प.सदस्य खोजरामजी मरस्कोल्हे, नागभीड नगरपरीषद मा. गटनेते दिनेशजी गावंडे,युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभभाऊ मुळे,पुरूषोत्तमजी बगमारे,विजयजी ठाकरे, माजी पं. स. सभापती प्रणयाताई गड्डमवार,सरपंच हेमंतभाऊ लांजेवार, कमलाकरजी ठवरे,विनायकजी रंधये, सरपंच गणेशभाऊ गड्डमवार, अमोलभाऊ बावणकर,तसेच काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.