✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.20फेब्रुवारी):-तालुक्यातील मांडवा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची २८४ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरापासून सकाळी दहा वाजता पारंपारिक नृत्य व वेशभूषेत श्री संत सेवालाल महाराज यांच्या पालखीसह, श्री संत सेवालाल महाराज ,जगदंबा माता,लक्कीसा बंजारा, माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, धर्मगुरू रामराव महाराज यांच्या प्रतिमा ह्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून काढुन मिरवणूकीची समाप्ती श्री संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरापाशी करण्यात आली . श्री संत सेवालाल महाराज की जय या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी तांड्याचे नायक तथा सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, कारभारी तुकाराम चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, श्री संत सेवालाल जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लहू चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी मंडळी गावातील प्रतिष्ठित नागरिक समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.