✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.20फेब्रुवारी):-संविधान सन्मान दिन समारोह समिती वडाळा पैकू चिमुरचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी मार्गदर्शनपर कार्यक्रमानंतर शरबत वितरण करण्यात आले.
संविधान सन्मान दिन समारोह समिती वडाळा पैकू चिमुरचे वतीने बहुजन स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज यांचा समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व त्यांच्या खऱ्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संविधान सन्मान दिन समारोह समिती गेली कित्येक वर्षापासून काम करीत आहे.
सुधाकरजी पाटील सं.स.दि. समारोह समिती हेअध्यक्ष *कार्यक्रमाचे अध्यक्ष* होते तर *प्रमुख पाहुणे* म्हणून न्यु. राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. सुनिल खोब्रागडे सर, मा. ममता निकाळजे (गौतम) नागपूर, रामकृष्णजी ताकसांडे *प्रमुख मार्गदर्शक* सुरेश राऊत, हरीजी मेश्राम, नंदन लोखंडे , निमढेला येथील पोलीस पाटील भिमा हनवते उपस्थित होते. संविधान समितीचे सचिव महेन्द्र लोखंडे यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले तर किशोर नागदेवते यांनी सूत्रसंचालन केले.
दिपकजी उके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चुन्नीलालजी कुडवे, कार्यवाहक पुंडलिक पाटील, दामोधर रामटेके, मनोज राऊत, आकाश भगत, गंगाधर भैसारे, सुभाष पेटकर, दिनेश भैसारे, पवन ताकसांडे, रामप्रसाद मेश्राम, गणेश रामटेके यांनी मोलाचे सहकार्य केले. या निमित्त भिमा हणवते पो.पा. यांचे हस्ते शरबत वितरण करण्यात आले.