Home महाराष्ट्र गंगाखेडात निवडणुक आयोगाच्या अयोग्य व चुकीच्या निर्णयाविरोधात निषेध.

गंगाखेडात निवडणुक आयोगाच्या अयोग्य व चुकीच्या निर्णयाविरोधात निषेध.

98

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20फेब्रुवारी):- धनुष्यबाण निशाणी व शिवसेना नाव हे शिंदे गटाला मिळाल्यामुळे उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनिकांनी निवडणुक आयोगाचा निषेध केला .तहसीलदार यांच्यामार्फत निवडणुक आयोगाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे कि 17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा गंगाखेड तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो शिवसेनेच्या विरोधात घटनेची पायमल्ली करत केंद्रिंय निवडणुक आयोग केंद्र सरकारच्या हातची कटपुतली बनत घटनाबाह्य निर्णय देवुन लोकशाहीचा गळादाबुन खुन केला आहे

या अण्याय कारक निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत निवेदनावर बाळासाहेब राखे,विष्णू मुरकुटे, संदिप राठोड, भागवत शिंदे,सिध्देश्वर आंधळे,राजेभाऊ शिंदे,ज्ञानेश्वर आंधळे,गणेश गुट्टे,कातकडे,कृष्णा आंधळे,महेश पुरणाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तर शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सातपुते,उपजिल्हाप्रमुख मनोज काकानी,शिवसेना नेते बाळू काबरा,पं.स.सदस्य जानकीराम पवार, शहरप्रमुख जितेश गोरे,युवासेना शहरप्रमुख गोविंद जाधव,कुंडलिक भडके, उपशहरप्रमुख रजत गायकवाड,शुभम पेचफुले, अनिल गरुड,सचिन आग्राळे,अमोल खटिंग,परमेश्वर कदम,पांडुरंग टाकसाळकर,गजानन घोगरे,माधव केंद्रे,भरत पवार व शिवसैनिक उपस्थित होते.त्यावेळी निवडणूक आयोग व शिंदे सरकारच्या निषेधार्थ घोषणा देउन निषेध व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here