अश्विन बोन्दाडे(हिंगणघाट,विशेष प्रतिनिधी)
हिंगणघाट(दि.18फेब्रुवारी):- पी एल सी मॉडलिंग वर्ल्ड हेरि साबोलानी द्वारा आयोजित मनी रत्न रिसॉर्ट ब्रिजलँड अमरावती येथे घेण्यात आली होती यामध्ये किड्स महाराष्ट्र मिस्टर महाराष्ट्र मिस महाराष्ट्र मिसेस महाराष्ट्र इत्यादी किताब देण्यात आलेत.
या प्रतियोगितेमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेपूर्वी पाच दिवसाची प्रशिक्षण देण्यात आले.
मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये कॅट वाॅक फॅशन शो च्या नंतर जजेस द्वारा सर्व संमतीने रागिनी मून यांचे मिसेस महाराष्ट्र सेकंड रनर अप म्हणून विजेता घोषित करण्यात आली.
रागिनी मून यांनी कॅट वाक सोबतच परिचय आणि जजेस द्वारा दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेत.
दिलेल्या उत्तरांची सर्वांनी प्रशंक्षा केली व शेवटी रागिनी मुन यांना ट्रॉफी ताज व सेशे घालून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने अतिथी म्हणून समीक्षा रामटेके, पल्लवी चौधरी, हरीदास छबलाने, कोमल मॅडम, खुशी मॅडम इत्यादी उपस्थित होते. मिसेस महाराष्ट्र द्वितीय रनर ऑफ म्हणून मिळालेल्या सन्मान व पारितोषिकचे श्रेय रागिणी यांनी चंद्रशेखर मून व राहुल डिघोरे दादा व मालुबाई दिघोरे आई आणि परिवर्तन मून यांना देण्यात आले.
या कार्यक्रमाला भरपूर लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यांचे आभार हेरी सबलानी व्यक्त केले.
गेल्या वर्षी 16/8/2022 मध्ये पार पडलेल्या मिसेस हिंगणघाट स्पर्धेत देखील रागिणी म्हणून यांना मिसेस हिंगणघाट म्हणून सन्मानित करण्यात आले.