Home धार्मिक  म्हसवड येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांची जयंती साजरी

म्हसवड येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांची जयंती साजरी

141

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.17फेब्रुवारी):-म्हसवड येथे पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या 74 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वाकी-वरकुटे येथे दलित पॅंथर संघटनेची शाखा उद्घघाटन करून तसेच मा,प्रमोद लोखंडे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन सत्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा बाळासाहेब पडवळ व उद्धघाटक दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले साहेब यांनी भुषविले प्रमुख उपस्थिती मान्यवर
मुंबई प्रदेशाध्यक्ष रोहित भंडारी महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वास मोरे व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे व राजेंद्र माने साहेब पश्चिम महाराष्ट्र संघटक महेंद्र वाघमारे मा, पुणे जिल्हाध्यक्ष व महाडिक साहेब पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुनील गायकवाड पुणे शहर सचिव पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश आवाडे रेखाताई सूर्यवंशी पुणे शहर उपाध्यक्ष आकाश डबकरे पुणे जिल्हा. उपाध्यक्ष सौ समीना शेख हडपसर विधानसभा अध्यक्ष व बाबू होळीकेरी जावेद भाई तांबोळी संजय साठे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष किरण बनसोडे सरपंच, माण संपर्क प्रमुख नवनाथ लोखंडे, माणदेशी शिक्षण संस्थापक अध्यक्ष धर्मराज लोखंडे, माण संघटक मल्हारी कांबळे, म्हसवड शहर कार्याध्यक्ष विक्रम लोखंडे, किरण खळवे(सरपंच शिरताव), माण विद्यार्थी संघटक आदित्य लोखंडे, शहाजी लोखंडे शहर अध्यक्ष वंचित, म्हसवड युवक शहर अध्यक्ष राजेश लोखंडे, वंचित युवा अध्यक्ष संतोष लोखंडे, लखन लोखंडे, गोपिनाथ लोखंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते व सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माण तालुका म्हसवड गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमां मध्ये दलित पॅंथर चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले साहेब यांनी सर्व पदाधिकारी व नागरिकांना आव्हान केले की गाव येथे शाखा वार्ड तिथे बोर्ड संघटना चांगली पद्धतीने बांधणी झाली पाहिजे याची नोंद घ्यावी! तसेच दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांना आव्हान केले की प्रत्येक जिल्हा व तालुकाध्यक्ष निवड करून संघटना बांधणी करा अशी घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here