✒️गोंडपीपरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
गोंडपिपरी(दि.17फेब्रुवारी):-दिनांक ९ फ्रेबूवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ ला जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे जिल्हा अधिकारी,कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. विवेक जान्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेच उद्घाटन करण्यात आले. त्या नंतर सर्व पाहुण्यांना पथसंचलन द्वारे मानवंदना देण्यात आली. गोंडपिपरी तालुक्याचं उत्कृष्ठ पथसंचलन रामेश्वर पातसे, विठ्ठल गोंडे यांनी केले. उद्घघाटन सोहळा संपल्यानंतर लगेचच स्पर्धा सुरू झाल्या. गोंडपिपरी तालुक्याने पुरुष विभागात खो खो, फूटबॉल या स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर महिला विभागातून फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत वैयक्तिक नृत्य महिला व पुरुष गट प्रथम क्रमांक, वैयत्तिक नक्कल पुरुष प्रथम क्रमांक, समुहगायन महिला प्रथम क्रमांक तर समुहगायन पुरुष द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच वैयतिक स्पर्धेत बॅटमिंटन मध्ये एकेरी महिला पुरुष द्वितीय तर दुहेरी पुरुष मध्ये द्वितीय क्रमांक मिळाला.
जलतरंग महिला द्वितीय, १५०० मीटर महिला प्रथम, लांब उडी महिला प्रथम अशा विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळविले. मैदानी चॅम्पियन द्वितीय क्रमांक, सांस्कृतिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर सर्व स्पर्धेची जनरल चॅमपियनशिप गोंडपिपरी तालुक्याला मिळवून २०२३ चा सर्वोत्कृष्ट तालुका ठरला. “बल्ले बल्ले गोंडपिपरी” या नाऱ्याने पूर्ण प्रियदर्शनी इंदिरा गांधी हॉल हादरून गेला. सर्व विजेत्या स्पर्धकांना विवेक जॉनसन (मुख्य कार्यकारी अधिकारी),शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, कल्पना चव्हाण तसेच इतर मान्यवर कडून बक्षिसे देण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना शालिक माऊलीकर ( गटविकास अधिकारी), समाधान भसारकर (गटशिक्षणधिकारी गोंडपिपरी) तालुक्यातील विलास रोहणकर, प्रेमकुमार चकीनाला, पत्रूजी डोके, इंद्रपाल मडावी, दुशांत निमकर, भाऊराव बोरकुटे केंद्रप्रमुख यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.