🔺एकूण 6,08,280 – रु चा मुद्द्यमाल जप्त करत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई
✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
यवतमाळ/उमरखेड (दि. 17 फेब्रुवारी) यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समु उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते.
त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनर पथकांना अवैध धंदयाची गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या
दिनांक 15 फेब्रुवारी २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. उमरखेड हददीत उघडकीस आलेले गुन्हे तसेच अवैध धंदयाबाबत गोपनीय माहिती संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपणीय माहिती मिळाली क उमरखेड येथील इसम नामे संतोष धुळे व किरण कांबळे हे दहागांव शेतशिवारात असलेल्या कॅनोलचे बाजुला असलेल उत्तम काकडे व महेश कव्हाने यांचे शेताचे चुन्यावर एक्का बादशाहा नावाचा हारजीतचा जुगार खेळ खेळत आहेत अ खात्रीलायक गोपणीयखबर प्राप्त झाल्याने खबरेचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थागुशा कडील पथकाने तात्काळ पंचार घटनास्थळी रवाना होवून छापा कारवाई केली असता एक्का बादशाह नावाचा जुगार खेळ खेळणारे 1) दिपक गोविंदरा कदम वय 42 वर्षे, रा. वसंतनगर, उमरखेड 2) गोपाल कैलास देवकते वय 28 वर्षे, रा. वसंतनगर, उमरखेड, 3) शे गुलाब शेख रहीम वय 48 वर्षे, रा. रहीमनगर उमरखेड, 4) कृष्णा महादोसिंग रुडे वय 34 वर्षे, रा. रुडे नगर, डा रोड, उमरखेड, 5) आनंदराव संभाजी कदम वय 38 वर्षे, रा. सुकळी, 6) संदीप सुभाषराव नाईक वय 35 वर्ष 2 पाटील नगर उमरखेड असे मोक्यावर मिळून आले तसेच 7) संतोष धुळे रा. एरिगेशन कॉलनी उमरखेड व 8) किर कचरा. उमरखंड व इतर 02 लोक मोकयावरून पळून गेले.
घटनास्थळावर मिळून आलेलं गंजीपत्ते व नगदी रुपये व आरोपीतांचे अंगझडतीमध्ये मिळून आलेले नग 23,280 – रु. तसेच 06 मोबाईल व 09 दुचाकी असा एकूण 6,08,280 – रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरु पोलीस स्टेशन उमरखेड येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी व मुददेमा पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशनचे ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई हो वरिष्ठांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल सांगळे, पोउपनि सागर भारस्कर, पोहवा सुभाष जाध पोना पंकज पातुरकर, साहल बंग, पोशी मो. ताज, चापोशी दिगांबर गिते सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यां यशस्वीरित्या पार पाडली.