Home महाराष्ट्र परिचित अपरिचित छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर रविवारी जाहीर व्याख्यान

परिचित अपरिचित छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर रविवारी जाहीर व्याख्यान

190

🔹माजी आमदार राजीव आवळे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.16फेब्रुवारी):- सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, मुक्ता फौंडेशन, कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त… त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी “परिचित अपरिचित छत्रपती शिवाजी महाराज” या महत्वपूर्ण व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलघडणाऱ्या विषयावर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे यांचे जाहीर व्याख्यान रविवार दि. 19 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 1:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सामाजिक विचारवंत माजी आमदार राजीव आवळे यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकी मानून करीत असलेल्या गेल्या 30-40 वर्षांच्या कामाची दखल घेऊन मुक्ता फौंडेशन, कोल्हापूर आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा या वर्षीचा नावाजलेला व सन्मानाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

त्याच बरोबर यावेळी अन्वी घाटगे, प्राचार्य डॉ. सतीश देसाई, छाया पाटील, शंकर अंदानी, शेख जावेद मंजूरपाशा, मोहन मिणचेकर, प्रा. डॉ. मोहन लोंढे, विजय साठे, रवींद्र श्रावस्ती, शंकर पुजारी, प्रा. प्रसाद दावणे, अपूर्वा पाटील, प्रा. डॉ. मारुती लोंढे, डॉ. विजय चांदणे, रूपाताई वायदंडे, प्रकाश सांडूगडे, काशिनाथ सुलाखेपाटील, डॉ. उत्तम सकट, बाबासाहेब माने, डॉ. सयाजीराव गायकवाड या मान्यवरांचा राज्यस्तरीय व्यक्तीवेध पुरस्कारही देण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. खंडेराव शिंदे तर सन्माननीय उपस्थिती म्हणून निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, मुक्ता फौंडेशन, कोल्हापूरचे प्रा. अमोल महापुरे उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट आणि मुक्ता फौंडेशन, कोल्हापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here