(RPI संविधान चे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)
✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.15फेब्रुवारी):-थायलंड देशातील ११० बौध्द भिक्खू संघासह तथागत गौतम बुद्ध यांचे अस्थी कलश धम्म पदयात्रेचे मंगलमय वातावरणात हजारो उपासकांकडून परभणी ते मुंबई महामार्गावर जागो जागी भव्य स्वागत करण्यात येत आहे. मात्र राज्यातील जातीवादि मीडियाने सदर इतिहासिक घटनेची नोंद घेतली नसल्याची खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे संस्थापक सरचिटणीस पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.*
17 जानेवारी पासून परभणी ते मुंबई चैत्यभूमी “चैत्यस्तूप” येथे निघालेल्या तथागतांच्या अस्थिकलश धम्म पदयात्रेच्या माध्यमातून अडीच हजार वर्षानंतर बुद्धांच्या अस्थींचे दर्शन महाराष्ट्रातील बुद्धानुयायांना मिळत आहे. हजारोंचा जनसमुदाय ओसांडला असतांना एकाही टी वी चॅनेलवाल्यांनी या इतिहासिक क्षणाची दखल घेतली नाही. म्हणजे बुद्धांच्याच मातीत बुद्धानाचं गद्दार झालेली पिलावळ तोंड वर काढत आहे. आणी अश्या पिलावळींचे आंबेडकरी तरुणांनी लवकरच तोंड ठेचणे गरजेचे आहे असल्याचेही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी म्हटले.
तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलश पदयात्रेत जागतिक धर्मगुरू भंते तेप्रिवय यधिष्ठी, भंते लॉंगफुजी, भंते सोंगसेक फॅन्टफियन यांच्यासह मुंबई येथील भंते विसुद्धानंद बोधी महाथेरो, भन्ते संघप्रिय, भंते पद्मपांनी, भंते शिलबोधी, समवेत अन्या विभाग व जिल्ह्यातील भंते सहभागी झाले.
नागरिकांना तथागत भगवान बुध्द यांच्या अस्थिधातू कलशाचे वंदन करायला महामार्गावर 5 ते 10 किलोमीटरपर्यत लांबच्या लांब रांगा लागल्या असतांना महाराष्ट्रीयन मीडिया झोपेत आहे की झोपेचे सोंग घेतले आहे असा प्रश्न ही डॉ. माकणीकर यांनी प्रसारमाध्यमांना केला.