✒️अनिल साळवे(गगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.13फेब्रुवारी):- येथील ऑल इंडिया पँथर सेना यांनी आज दिनांक 13 फेबूरवारी रोजी मुख्याधिकारी गंगाखेड नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनवार गंगाखेड शहरातील सोंदर्यात भर पडणारा चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा असून ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या पूर्वी या चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे. चौका समोरून मेन रोड चे काम सुरु असून या मुळे चौकात अस्थव्यस्त झाला असून खालील प्रकारे कामे करण्यात यावी.
1)पुतळ्याला कलर करून चौका ची रंग रांगोटी करण्यात यावी. 2) पुतळ्याच्या पूर्व बाजूस रिकामी जागा असून या जागेला स्वरक्षण भिंत बांधून कलर मारून डिझाईन करण्यात यावी. 3)पुतळ्याच्या पाठी पाठीमागे उभी भिंत असून त्या भिंतीच्या काळ्या कलर ची फर्शी काडून पांढऱ्या कलरची संगमरीमरी फर्शी लावण्यात यावी.चौकाचे सुशोभीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या पूर्वी कामे करण्यात यावे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना गंगाखेड च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर संतोष हाणवते, विकास रोडे, अशोक व्हावळे रोहिदास लांडगे, अविनाश जगतकर, सुभाष शिंदे, चंद्रशेखर साळवे, यांच्या स्वाक्षरी केल्या आहेत.