✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपुर(दि.13फेब्रुवारी):-राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक पत्रकार संघटना या रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी विविध प्रकारे या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी सरकारने घ्यायला हवी आणि ज्यांच्यावर असे हल्ले होत आहेत किंवा जे अशा हल्ल्यांचे बळी जात आहेत त्यांना तातडीने सरकारने आपल्या तिजोरीतून योग्य ती मदत तातडीने केली पाहिजे असे राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांना गाडी खाली चिरडून ठार करण्यात आले. रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून दलाल पंढरीनाथ आंबेरकर यानं ही निर्घृण हत्या केली. त्याची संतप्त प्रतिक्रिया राज्यभर उमटली आहे.