🔸क्रिकेट ह्या खेळात जरतर ची भाषा चालत नाही-नारायण हिवरकर(भाजपा तालुका अध्यक्ष)
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.12फेब्रुवारी);-जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे कॅटेबरी बस डेरी मिल्क गुडलक गर्ल या संस्थेच्या माध्यमातून तालुका स्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेनी सहभाग घेतला जिल्हापरिषद हायस्कूल कन्हाळगाव, प्रिय दर्शनी हायस्कूल पारडी, महात्मा गांधी विद्यालय गडचांदुर, माहात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली, डी डी विद्यालय कढोली खुर्द, जिल्हा परिषद शाळा कवठाडा आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक नारायण हिवरकर (भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) होते.
तर प्रमुख पाहुणे स्वतंत्रकुमार शुक्ला, मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव, विनोद नवले उपसरपंच, सि एम अरूण मोहिते, मरापे सर, दरेकर, जिवणे सर, श्री गोंडे, डोहे सर, निखिल चौधरी, सौ बांदुरकर मॅडम, कु अफसाना मॅडम, केतन ढासले (पंच), दामोदर भोयर (पंच) आदी मान्यवर उपस्थित होते. नारायण हिवरकर यांनी क्रिकेट स्पर्धेचे रीतसर उद्घाटन केले व सर्व खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्पर्धा संपताच या स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव या टीमने अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला तर उपविजेता प्रियदर्शनी हास्कुल शाळा पारडी आणि तिसरे बक्षीस डी डी विद्यालय कढोली खुर्द ला घवघवीत यश मिळाले.
या विजेता टीमला नारायण हिवरकर यांनी कप, शील्ड, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन तिन्ही विजेता टीमचा सत्कार केला. नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात क्रीडा क्षेत्रात जरतर ची भाषा चालत नाही प्रत्येक खेळाडूला यशयस्वी होन्यासाठी प्रत्यक्ष मेहनत करून यश संपादन करावे लागते, त्याच प्रमाणे जिवनात सुध्दा चांगल कार्य करुन तालुका, जिल्हा, प्रदेश स्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यशयस्वी व्हा आपल्या शाळेच, तालुक्याच, जिल्ह्याच, नाव लौकीक करा व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशयस्वी व्हा अशा सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य कु बिस्वा मॅडम, विध्या तामगाडगे, सितल बोरकर, कोमल पडणारे, निलम वर्मा, पोर्णिमा चांदेकर, तालुक्यातील, गावातील विद्यार्थी विद्यार्थीनी खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन, आभार स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक यांनी मानले.