✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.12फेब्रुवारी):- येथील गायत्री बाल संस्कार विद्यामंदिर या बालवाडीत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान मिळावे म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात २५ विद्यार्थ्यांनी स्टॉल्स उभारले होते. दिवसभरात विविध पदार्थाच्या विक्रीतून ५ हजार रुपयांची कमाई केली. बंसल क्लासेस गेवराईचे संचालक गोविंद सारडा यांच्या हस्ते आनंदनगरीचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून गायत्री विद्यामंदिर येथे आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ,अशी माहिती शाळेचे अध्यक्ष प्राचार्य राम महासाहेब यांनी दिली.
या उपक्रमात शाळेतील तब्बल 100 बालगोपालांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच साहित्य बनवून आणून शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी शाळेचे अध्यक्ष प्राचार्य राम जी महासाहेब , सचिव श्रीमती सीता महासाहेब ,बंसल क्लासेसचे समुपदेशक श्रीमती खरात मॅडम, बोडखे , उबाळे , काळे ,माटे , अश्विनी मॅडम आदींची उपस्थिती होती.