✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.१२फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व शिंदे गटाच्या वतीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते शिवराज पवार तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस विविध ठिकाणी विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला याचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन रक्तदान केले. यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी युवा नेते शिवराज पवार उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राजेश शिंदे उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, तालुकाप्रमुख शिन्नुभाऊ बेदरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार, अमोल वैद्य, सुशील टकले, जुनेद बागवान रुग्णालयातील कर्मचारी व बाळासाहेब यांची शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी सिन्नू बेदरे, शंकरमामा वैद्य, डॉ. देशपांडे सर, माऊली बेदरे, महेश शेठ मोटे, सचिन दाभाडे, प्रमोद रोंगे, पंकज शेठ शर्मा, पिंटू पानखडे, पप्पू बांडे, सुरेश होके, अनिकेत भुते सह उपस्थित होते