Home महाराष्ट्र पुसद येथील महात्मा मुंगसाजी विद्यालयाचे शिक्षक उमेश इंगळे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

पुसद येथील महात्मा मुंगसाजी विद्यालयाचे शिक्षक उमेश इंगळे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

151

🔸सतत दुसऱ्या वर्षी जिल्हयात पहिला

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11फेब्रुवारी):-सर्व स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सृजनशील तिला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन केले जाते.

यवतमाळ डायटद्वारे नवोपक्रमाची प्रथम व दुसरी फेरी घेण्यात आली, यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि मुख्याध्यापक गटातून महात्मा मुंगसाजी विद्यालय पुसदचे शिक्षक उमेश इंगळे यांचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला. “परिपाठातून विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठ कौशल्य निर्माण करणे “या त्यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे ,त्यामुळे जिल्ह्याच्या आशा वाढल्या आहे . मागील वर्षी “मिशन एनटीएस स्पर्धात्मक परीक्षा यशस्वीतेचा मार्ग ” या त्यांचा नवोपक्रमला राज्यात पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते .

या नवोपक्रमाची एससीईआरटी च्या संकेतस्थळावर नोंद झाली आहे ,असा बहुमान प्राप्त करणारे जिल्हयातील पहिले माध्यमिक शिक्षक ठरले आहे. त्यांना डायटचे प्राचार्य डॉ प्रशांत गावंडे ,प्राध्यापक डॉ राऊत , गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, केंद्रप्रमुख अमित बोजेवार , गटसाधन व्यक्ती लक्ष्मण वाघमारे ,सारंगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवणारे इंगळे सरांचे अभिनंदन संस्थेचे आधारस्तंभ माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब, संस्था अध्यक्ष जितेंद्र मोघे, संचालिका आशाताई पांडे मॅडम ,सचिव शामराव व्यवहारे ,संचालक ज्ञानेश्वर तडसे, सुधाकर ठाकरे ,किसनराव भूरके ,भगवानराव डाखोरे, लिलाधर मळघणे , मुख्याध्यापक राजेंद्र पावडे, महेंद्र उंदरे ,शिक्षक बापूराव मुसळे ,पद्मावती बद्री पंडित पतंगे, राजाराम चव्हाण प्रकाश आडे , अविनाश पाठक नारायण नांदे ,आत्राम सर, दाऊद खान, लिपिक संजय ठाकरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here