Home महाराष्ट्र ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात माता रमाई यांना अभिवादन

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात माता रमाई यांना अभिवादन

124

🔸दुःख, त्याग व उदंड मानवतेच्या प्रेरणास्थान म्हणजे रमाई- किरण बोढे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.7फेब्रुवारी):- येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी माता रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी अभिवादन केले.

यावेळी बोलतांना प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, दुःख, त्याग व उदंड मानवतेच्या प्रेरणास्थान म्हणजे माता रमाई. विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधीच आपल्या दुःखाची जाणीव होऊ दिली नाही.पती विदेशात शिक्षणासाठी गेले. तेव्हा रमाई एकट्या पडल्या तरी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने व कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.

यावेळी निशा उरकुडे, लता आवारी, गीता येनगद्दलवार, सुनीता तोकलवार, विमला यादव, संगीता हिवरकर, शारदा झाडे, वैशाली भालशंकर, शारदा फुलझले, छाया पाटील, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here