✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.7 फेब्रुवारी):- पिंपळगाव भोसले इथे मागील दोन अडीच महिन्यापासून रोडचे काम सुरू आहेत अशा अवस्थेत संबंधित ठेकेदारांनी रोडवर काळी गिट्टी टाकलेली आहे या काळी गिट्टी वरून मोटारसायकल, चारचाकी, मंडित भाजीपाला विक्रीला नेणारे तसेच सायकल स्वार या लोकांना ये- जा करण्यास कमालीचा त्रास होत असतो. खूप वेळा मोटारसायकल स्वार स्लिप होऊन अपघातात बळी झालेले आहेत, तेव्हा संबंधित कंत्राटदारांनी लवकरात लवकर पूर्ण रोड दुरुस्त करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
थोड्या थोड्या वेळाने हे काम कासवगतीने होत आहे मुरूम टाकल्यानंतर पंधरा-वीस दिवसांनी बंद ठेवून गिट्टी टाकलेली आहे त्याचप्रमाणे गिट्टीचा एक थर टाकल्यानंतर दुसऱ्या थराला पंधरा दिवस कालावधी देऊन हे काम करीत आहेत काल गिट्टीचा ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन कोणतीही नुकसान झाली नाही परंतु भविष्यात कोणतीही जिवीत हानी नाकारता येणार नाही त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी हा रस्ता लवकर करावे अशी मागणी गावकरी नागरिकांनी केली आहे.