✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)
गेवराई(दि.5फेब्रुवारी):- तालुक्यातील तलवाडा येथील छत्रपति शिवाजी महाराज चौक या ठिकाणी समाज सुधारक दैवी आवतार सज्ञाप्राप्त संत रविदास महाराज यांची जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थिति मध्ये शहादेव खंडागळे यांच्या रहात्या घरा समोरील त्यांच्या व्यावसायिक दुकाना समोर व तलवाडा ग्रामपंचायत सह विविध ठिकाणी विधिपूर्वक साजरी करण्यात आली. या वेळी हभप गणेश महाराज कचरे यांनी संत शिरोमणि रविदास महाराज यांच्या जिवनाचे आणेक सार मार्गदर्शन करतांना सागीतले.
पंधराव्या-सोळाव्या शतकातील गुरु रविदास एक महान संत, तत्वज्ञ, कवी, समाज सुधारक आणि देवाचे अनुयायी होते. उत्तर भारतातील भक्ती चळवळीचे नेतृत्व करणारे निर्गुण पंथातील एक प्रख्यात संत होते. संत रविदास खूप चांगले कवी होते, त्यांच्या रचनांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे अनुयायी, समाज आणि देशातील अनेक लोकांना धार्मिक आणि सामाजिक संदेश दिला. संत रविदासजींच्या रचनांमध्ये, त्यांच्यावर देवावरील प्रेमाची झलक स्पष्टपणे दिसून येत होती, ते आपल्या रचनांच्या माध्यमातून इतरांनाही देवावरील प्रेमाबद्दल सांगत असत आणि त्यांच्यात सामील होण्यास सांगत असत.
सामान्य लोक त्यांना मशीहा मानत असत, कारण त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी कामे केली होती. पुष्कळ लोकांनी त्याची उपासना देवाप्रमाणे केली आणि आजही त्याची उपासना देवा समान केली जात आसल्याचे गणेश महाराज कचरे यांनी सांगीतले. यावेळी तलवाडा गावचे सरपंच प्रतिनिधि विष्णु तात्या हात्ते, समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू आण्णा गाडेकर, हभप गणेश महाराज कचरे, साहेबा कु-हाडे,पिंटूशेठ गर्जे,अरुण डोंगरे, गोतम आठवले, पत्रकार सचिन डोंगरे सर, विष्णु राठोड, शेख आतिखभाई, अशोक सुरासे, रवि जी गांधले, शहादेव नमस्ते खंडागळे, डाॅ. सुरेश गांधले यांच्यासह मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.