Home महाराष्ट्र अरुणभाऊ झाडे महाविद्यालयातर्फे साहित्यिक पत्रकार राजेश बारसागडे यांचा सत्कार

अरुणभाऊ झाडे महाविद्यालयातर्फे साहित्यिक पत्रकार राजेश बारसागडे यांचा सत्कार

120

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.3फेब्रुवारी) :-नागभीड तालुक्यातील नांदेड येथील अरुणभाऊ झाडे विद्यालय तथा महाविद्यालयातर्फे सावरगाव येथील महाराष्ट्र शासन ‘बालकवी’ पुरस्कार प्राप्त कवी, पत्रकार,तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश बारसागडे यांचा शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रामगीता प्रदान करून संस्थापक अरुणभाऊ झाडे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी नागभीड पं.स.चे आरोग्य विस्तार अधिकारी अरुण घाटोळे,जेष्ट सामाजिक कार्यकर्ते कोरडे, विद्यालयाचे से.नि. शिक्षक अनिल कंठीवार,पठाण,सरपंच मुर्लीधर गौरकार,संस्थाध्यक्ष अल्का झाडे,सचिव कल्पना घाटोळे,प्राचार्य अरविंद राऊत,सामाजिक सेवक परमेश्वर मडावी,आदींची उपस्थिती होती.

राजेश बारसागडे हे मागील 25 वर्षांपासून अविरत साहित्य, पत्रकारिता व सामाजिक कार्यात समाजाची सेवा करीत आहेत. त्यांच्या “कोंबडा झाला घड्याळ” या बालकविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा ‘बालकवी’ पुरस्कार मिळाला आहे.यासोबतच अन्य पुरस्कार सुद्धा त्यांना लाभले आहेत.त्यांचे चारोळी,बालकविता व ललित या विषयांचे 3 पुस्तके प्रकाशित झाले आहेत.आणि अनेक साहित्य महाराष्ट्रातील अनेक नामवंत वृतपत्र, साप्ताहिकं,नियतकालिक, मासिक,दिवाळी अंक यातून निरंतर प्रकाशित होत असतात.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल स्व.नामदेवराव झाडे शैक्षणिक संस्थेच्या नांदेड येथील अरुणभाऊ झाडे विद्यालय तथा महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सांस्कृतिक महोत्सवात शाल, श्रीफल,पुष्पगुच्छ व ग्रामगीता प्रदान करून संस्थापक अरुणभाऊ झाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here