✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
चोपड(दि.३० जानेवारी):-२०२३ रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील व्यवस्थापन विभाग व जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने SPORT DAY चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट व रस्सीखेच आणि विद्यार्थिनींसाठी बँडमींटन व रस्सीखेच या मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी व उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. उदघाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी अध्यक्षीय मनोगतव्यक्त करतांना म्हणाले की, मैदानी खेळांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वाढून याचा आपल्या व्यक्तिमत्व विकासात फायदा होतो.या उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभागप्रमुख सौ.के.एस.क्षीरसागर यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार व्यवस्थापन विभाग प्रमुख अभिजित साळुंखे यांनी मानलेत.या स्पर्धांमध्ये व्यवस्थापन विभागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुलांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेत विभागातील एकूण ४ संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत बीसीए प्रथम वर्ष हा संघ विजेता व बीसीए द्वितीय वर्ष हा संघ उपविजेता ठरला.
तसेच मुलांसाठी आयोजित रस्सीखेच स्पर्धेत देखील विभागातील एकूण ४ संघांनी सहभाग नोंदवला होता. रस्सीखेच स्पर्धेत प्रत्येक संघात ७ खेळाडूंचा समावेश होता. यात बीसीए द्वितीय वर्ष हा संघ विजेता व बीसीए तृतीय वर्ष हा संघ उपविजेता ठरला. मुलींसाठी आयोजित रस्सीखेच स्पर्धेत एकूण २ संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेत बीसीए प्रथम वर्ष या संघाने विजेतेपद व बीसीए द्वितीय वर्ष या संघाने उपविजेतेपद पटकावले. तसेच मुलींसाठी आयोजित बँडमींटन स्पर्धा ही वैयक्तिक स्वरुपाची होती. बँडमींटन स्पर्धेत एकूण ३५ मुली सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत बीसीए द्वितीय वर्ष वर्गाची विद्यार्थिनी कु. श्रुती चौधरी विजेती तर बीसीए द्वितीय वर्ष याच वर्गाची विद्यार्थिनी कु. दिशा पाटील ही उपविजेती ठरली. सर्व विजेते, उपविजेते व सहभागी खेळाडूंचे मा. प्राचार्य, सर्व विद्याशाखांचे उपप्राचार्य यांनी कौतुक केले.
स्पर्धा समन्वयक म्हणून सौ.के.एस.क्षीरसागर व अभिजित साळुंखे यांनी कार्य केले तसेच स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागातील शिक्षक अमोल पाटील, व्यवस्थापन विभागातील सहा.प्रा.बळीराम बाविस्कर, सहा.प्रा.घनश्याम पटेल, सहा.प्रा.सौ.आर.पी.जैस्वाल, सहा.प्रा.सौ.मोहिनी सोनवणे, सहा.प्रा.पल्लवी कासार, सहा.प्रा.गौरव पिंगळे, सहा.प्रा.अश्विनी पाटील, अभिजित पाटील, रवींद्र पाटील यांनी परिश्रम घेतलेत.