Home महाराष्ट्र फुले एज्युकेशन तर्फे सामाजिक कार्यामुळे प्रजासत्ताक दिनी पत्रकार विजय टाकणे सन्मानित

फुले एज्युकेशन तर्फे सामाजिक कार्यामुळे प्रजासत्ताक दिनी पत्रकार विजय टाकणे सन्मानित

136

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो,-9075686100

म्हसवड(दि.29जानेवारी):-सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे सामाजिक कार्य आणि निर्भिड पत्रकारिता यामुळे दैनिक माणदेश न्यूजचे संपादक मा. विजय टाकणे यांचा उद्योजक अनिल ढोक यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम ,शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचेच कार्यालयात सन्मान केला.यावेळी माणदेश शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष धर्मराज लोखंडे,पत्रकार सचिन सरतापे,महेश सराटे ,सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवते,उद्योजक पिंटू पिसे,राजाभाऊ डोंबे इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की महात्मा बसवेश्वर महाराज पासून फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्य पुढे नेण्यासाठी तसेच विचार रुजविण्यासाठी विजय टाकणे यांचे मोलाचे योगदान असून सामाजिक कार्यात ते पुढाकार घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून मदत करीत असल्याचे पाहिले. सोबतच आपले लोक व्यसनाधीन होणार नाहीत यासाठी सातत्याने प्रयत्न करताना देखील पाहिले व अनुभवले म्हणूनच आज 74 व्या भारतीय प्रजासत्ताकदिनी त्यांचा सन्मान करताना आमच्या संस्थेला आनंद होत असल्याचे म्हंटले आहे.पुढे ते म्हणाले की सत्यशोधक पद्धतीचे कार्य पुढे नेण्यासाठी देखील त्यांचे मोलाचे योगदान भरीव आहे म्हणूनच आजच्या शुभ दिनी खास पुण्यावरून येऊन संस्थेच्या वतीने त्यांचा हा सन्मान केल्याचे सांगितले.

उद्योजक अनिल ढोक म्हणाले की सामाजिक कार्य करीत असताना आपण आपले अर्थकारण मजबुत करा म्हणजे सामाजिक कार्य करण्यासाठी बळ मिळते.याचे उदाहरण म्हणजे विजयराव आहेत आपले इतर कार्य करीत असताना ते धान्य बाजार देखील करीत आहेत.थोडक्यात अगोदर स्वबळावर प्रत्येकाने उभे राहून मगच समाजकारण , राजकारण करावे.या कार्यक्रम साठी रमेश पिसे यांनी सहकार्य केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here