Home महाराष्ट्र समाजातील महीला व विद्यार्थी यांना पूढे जाण्यासाठी प्रेरीत करा – प्रज्ञा राजुरवाडे

समाजातील महीला व विद्यार्थी यांना पूढे जाण्यासाठी प्रेरीत करा – प्रज्ञा राजुरवाडे

139

🔸जानेवारी महिन्यात जन्मलेल्या थोर क्रांतीकारी स्त्रियांची जयंती

🔹महाराष्ट्र पुरोगामी प्राथमीक शिक्षक समिती महीला मंच चे आयोजन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29जानेवारी):-माता रमाईच्या त्यागातून डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले. मॉ जिजाऊ चे मातृत्व सावित्रीबाई फुलें ची लेखनी समाजातील स्त्रियांना प्रेरणा देतात. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या हक्कासाठी लढत स्त्रियांसाठी हिंदू कोड बील लिहलं त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे. महीला ही समाजाचा सन्मान आहे एक महिला सुदृढ समाज निर्माण करू शकते तेव्हा वास्तवदर्शी समाजाचा आरसा बनून समाजातील महिला व विद्यार्थी यांना पुढे जान्यासाठी प्रेरीत करा. संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या उद्धघाटनाप्रसंगी आधूनिक क्रांतीकारी स्त्रियांचे विचार व त्यांच्या विचारांची आज असणारी गरज या विषयांवर महिलांना मार्गदर्शन डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पूणेच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे बोलत होत्या.

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमीक शिक्षक समिती महीला विचार मंच चिमूरच्या वतीने जानेवारी महिन्यात जन्मलेल्या क्रांतीकारी थोर स्त्रियां मॉ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता रमाई यांच्या जयंतीचा कार्यक्रम शनिवार ला पार पडला.पूढे बोलतांना राजूरवाडे म्हणाल्या की, शिक्षक समाजाची आधार शिला आहे. प्रत्येक शिक्षीकेंनी मी स्वस्ता मॉ जिजाऊ, सावित्री, फातिमा आहे असे समजून त्यांचा प्रेरणादायी विचार पूढे नेण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ पुरोगामी कार्यकर्त्या माधूरी राजस, प्रमुख अतिथी माधूरी काळे, चिचपाले, माधूरी महाजन, माधूरी वाघमारे वंदना हटवार जेष्ठ पुरोगामी कार्यकर्त्या निमजे आदी उपस्थीत होत्या. कार्यक्रमाचे संचालन वैशाली डवले, प्रास्तावीक संध्या गोंडाने, आभार जोगी यांनी केले. कार्यक्रमात जेष्ठ पुरोगामी कार्यकर्त्यां निमजे यांनी दोन पथनाट्य सादर केले. दरम्यान हळदी कुंक, रांगोळी कार्यक्रम घेण्यात आला. काही शिक्षक महिलांनी गायन केले. अनेक मान्यवर महिलांची भाषणे झाली. मात्र कार्यक्रमादरम्यान लाल कलर च्या साड्यामधिल सर्व महिला भगिनीची उपस्थीती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here