Home महाराष्ट्र राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा प्रदेशव्यापी परिवर्तन यात्रा 30 जानेवारीला चिमूर तालुक्यात

राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा प्रदेशव्यापी परिवर्तन यात्रा 30 जानेवारीला चिमूर तालुक्यात

126

🔸राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल राहणार उपस्थित

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29जानेवारी):-राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा प्रदेश्व्यापी परिवर्तन यात्राचे आगमन 30 जानेवारी रोजी चिमूर तालुक्यातील कोलारा येथे आगमन होत असून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे हस्ते उद्घघाटण होणार असून राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल उपस्थित राहणार आहेत,

जाती आधारित जनगणना, ई एम व्ही घोटाला, क्रिमिलर अट रद्द करा, ओबीसीना 52 टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, व अन्य मागण्या घेऊन परीवर्तन यात्रा चिमूर तालुक्यातील कोलारा येथे 30 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता गुरुदेव मंदिरच्या प्रांगणात येत राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल यांचे नेतृत्वात येत असून परिवर्तन यात्रेचे उद्घघाटन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपूर विभाग अध्यक्ष श्रीहरी सुभाषराव झनक यांचे हस्ते होणार असून बहुजन मुक्ती मोर्चाचे राज्य अध्यक्ष श्रीकांत ओहोल, बहुजन मुक्ती मोर्चाचे नागभीड तालुका संयोजक दिनेश शाक्य, तंटा मुक्त समिती अध्यक्ष रतिराम डेकाटे, सज्जन गेडाम, अशोक गेडाम, माधव मडावी, अशोक सिडाम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील,परिवर्तन यात्रेकरीता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन मुक्ती मोर्चाचे तालुका संयोजक योगेश गेडाम यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here