Home चंद्रपूर घुग्घुस शहरात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, महामानव प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

घुग्घुस शहरात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, महामानव प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा गणमान्यवरांच्या उपस्थिीत मोठया आनंददायी थाटात संपन्न…..

147

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.29जानेवारी):-जिल्हाच नव्हे तर विदर्भ आणि महाराष्ट्रभर दूरवर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिध्द आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीत गेले अनेक वर्षापासून महत्वाची भूमिका बजावत असलेल्या घुग्घुस येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा लोकसहभागातून शहराच्या मध्यभागी उभारण्याचा संकल्प घुग्घुस येथील नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समितीने बरेच वर्षापूर्वी केला होता. पुतळा तहसील कार्यालयाजवळील पटांगणावर उभारण्याचे ठरले. ही जागा पुतळयाकरीता मिळविण्याकरीता अनेक मान्यवर आणि हितचिंतकांनी भरपूर सहकार्य केले आणि अखेर स्पप्नपूर्ती होऊन हा पुतळा नियोजित ठिकाणी बसविण्यात आला.

९ फुट उंचीचा घुग्घुस शहरातील सर्वात उंच आणि भव्य पुतळा घुग्घुस शहराच्या वैभवात भर टाकणारा आहे आणि प्रेरणा देणारा ही ! या भव्य पुतळ्याचे अनावरण भारतीय प्रजासत्ताक दिनांच्या मंगल पर्वावर घुग्घुस येथील नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समितीच्या वतीने दिनांक २६ जानेवारी, २०२३ ला सकाळी १०.०० वाजता घुग्घुस शहरात धम्म मिरवणूक काढण्यात आली व सायंकाळी ५.०० वाजता समितीच्या पटांगणात नागपूर दिक्षाभूमीचे अध्यक्ष प.पु. भंते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प.पु. भंते नागार्जुन सुरई ससाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले व प्रमुख उपस्थितीत मा. श्री. नरेशबाबू पुगलिया, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार मा. श्री. किशोरभाऊ जोरगेवार, भद्रावतीचे आमदार मा. सौ. प्रतिभाताई धानोरकर, कार्यक्रमाचे संयोजक मा. श्री. राहूलबाबू पुगलिया, नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समितीचे अध्यक्ष मा. श्री रामचंद्र चंदनखेडे, आर.पी.आय.चे अध्यक्ष मा. श्री. प्रविण खोब्रागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यानंतर व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समितीचे वतीने करण्यात आले.

ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी संविधान हम सबको हक्क-भि दिलाता है और संविधान हम सबको कर्तव्य की याद भि दिलाता है, जेव्हा घुग्घुसच्या रस्त्यावरून कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्ती आपल्या गावामध्ये जाईल तेव्हा या विश्वरत्न डॉ बाबासाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याकडे बघत आपले दायित्व काय आहे, कर्तव्य काय आहे याचे स्मरण करेल. जेव्हा एखाद्या विद्यार्थी बाबासाहेबांच्या पुतळयाकडे बघेल तेव्हा म्हणेल शिक्षण वाघीणीचे दूध आहे, शिका संघटीत व्हा, संघर्ष करा हा मंत्र आठवेल, श्रीमान नरेशबाबूजींनी आंबेडकर भवन उभारण्यासाठी मागणी केली ती मागणी खरचं रास्त आहे त्यांनी आपल्या अंतकरणानी ही मागणी केली आहे. या भवना करीता मी सर्वतोपरी मदत करेल व असा सभागृह झाला पाहीजे तो फक्त सिमेंट काँक्रीटचा नसेल तो भवन मानव धर्माला वाढविणारा असला पाहीजे असे उदगार मंत्री महोदयांनी काढले.

या अनावरण सोहळयात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांनी मनोगत व्यक्त केले की, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगलपर्वावर पुतळ्याचे अनावरण करतांना अतिशय आनंद होत आहे कारण भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून हे देशातील १४० कोटी जनतेचे आहे व आज त्यांच्या संविधानावर देश प्रगतीपथावर आहे. आज या अनावरण सोहळ्यात सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित आहेत हेच बाबासाहेबांची देण आहे. या पुतळा परीसरात सौंदर्यीकरण व सुशोभित असा भव्य दिव्य बाबासाहेबांच्या विचारांचा भवन तयार व्हावा ही ईच्छा व्यक्त केली.यामध्ये लोकप्रतिनिधींनी सुध्दा प्रयत्न करावे असे आव्हान केले.तसेच या पुतळा उभारणीसाठी ज्या मान्यवरांनी सर्वतोपरीने प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानले.

तसेच चंद्रपूरचे आमदार मा. श्री. किशोरभाऊ जोरगेवार व भद्रावतीचे आमदार मा. सौ. प्रतिभाताई धानोरकर यांनी सुध्दा या आंबेडकर भवनाला साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे म्हटले.या अनावरण सोहळ्याला उपस्थित हजारो जनतेनी भोजनाचा आस्वाद घेऊन दुय्यम कव्वालीचा आनंद घेतला. सदर अनावरण सोहळ्यात सर्व पक्षाचे, सर्व जाती-धर्माचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, हा अनावरण सोहळ्याने संपूर्ण घुग्घुस परीसर जयभीम च्या घोषणानी दुमदुमले. सदर कार्यक्रमात आयोजक नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समितीचे पदाधिकारी, कार्यकारीणीचे सदस्य या सर्वांनी आनंददायी अनावरण सोहळयात परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here