✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.27 जानेवारी):- कुणबी समाजात असलेल्या सर्व शाखीय पोटजातीना संघटित करण्याच्या दृष्टीने तसेच मुला -मुलींची माहिती मिळण्याच्या दृष्टीने अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरी द्वारा सर्व पोट जातीय वधू -वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम दिनांक 29 जानेवारी 2023 रोज रविवारला स्वागत मंगल कार्यालय ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
वधु -वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऋषीजी राऊत अध्यक्ष अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरी, प्रमुख अतिथी म्हणून उषाताई चौधरी तहसीलदार ब्रम्हपुरी, डॉ. सतीशभाऊ दोनाडकर ब्रह्मपुरी, दामोधरजी मिसार संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, तारकेश्वर बहेकार साहेब, प्रमोदभाऊ चिमूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, कीष्णाभाऊ सहारे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, भाऊराव राऊत से.नि. मुख्याध्यापक, अँड. गोविदराव भेडारकर,प्रमोदजी तोंडरे, सुचित्राताई ठाकरे संचालक जी मध्य, सह बँक चंद्रपूर, प्रा. ज्योती दुपारे, प्रा. राकेश तलमले ,महेश भर्रे नियोजन सभापती ,हितेंद्र राऊत नगरसेवक, नगरसेविका अंजलीताई उरकुडे, सौ. लताताई ठाकुर, सरिताताई पारधी, व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कुणबी समाजातील समस्त बांधवांनी व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.