Home महाराष्ट्र “फुटपाथ शाळेत ” 74 व्या प्रजासत्ताक व संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

“फुटपाथ शाळेत ” 74 व्या प्रजासत्ताक व संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

111

✒️देवळी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

देवळी(दि.27जानेवारी):– आपण दरवषी 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. तर यावर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2023 हा 74 व्या प्रजासत्ताक दिवस आहे. आपल्या देशाच्या दृष्टीने 15 आगस्त्त व 26 जानेवारी हे दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. ज्यामुळे आपण या दिवसाला खूप महत्व देत असतो. त्यामुळे फुटपाथ शाळेत ध्वजारोहन व अल्पोहाराचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. देवळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीमध्ये भटक्या जमातीचे नागरिक वास्तव्य करीत असून त्यांची मुले इतरत्र भटकत असायचे म्हणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या आशेने भारत सामाजिक विकास ग्रुप देवळीच्या माध्यमातून चालवीत असलेल्या “फुटपाथ शाळा” मागील एक वर्षापासून ग्रुपचे सदस्य अथक प्रयत्न करीत आहे.

त्यामध्ये कुठलीही अपेक्षा किंवा मोबदला न घेता त्यांना शारीरिक , मानसिक , शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तर त्यातील काही मुलांना स्थानिक देवळी शहरातील शाळेत दाखल सुद्धा केलेले आहेत तर या ध्वजारोहनाप्रसंगी अजयजी रामटेके बँक मॅनेजर , माजी सरपंच प्रशांतजी निबाळकर , आम आदमी पार्टीचे जिल्हा सहसंयोजक किरणजी पारिसे व तसेच ज्येष्ठ पत्रकार गणेशजी शेंडे , युवा पत्रकार रवींद्र पारिसे , समाजसेविका निर्मलाबाई वैद्य यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर काहींनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आपल्या देशात संविधान आहे या संविधानानुसार आपल्या देशाचा कार्यभार चालतो म्हणून संविधान व प्रजासत्ताक दिवस साजरा करतात.

तसेच हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा , उत्सवाचा व अभिमानाचा असा राष्ट्रीय दिवस आहे.तर किरण पारीसे यांनी वाहतुकीचे नियमाबद्दल विशेष मार्गदर्शन अशा पद्धतीचे मत , विचार मांडले तर या कार्यक्रमाचे आयोजन सचिन वैद्य आणि संचालन गणेश शेंडे तर रेणुका दुरबुडे यांनी उपस्थितांचे खूप खूप आभार मानले तसेच जयंतजी दुरबुडे यांचे सुध्दा योगदान लाभले असून विद्यार्थी रोशन शिंदे , गजानन पवार ,श्रीराम पवार ,अजय पवार ,दीपक पवार ,योगेश तांबे ,निशा तांबे , दुर्गा पवार ,पूजा पवार , आरती पवार , साजन , सात्विक , तनुश्री व हर्षल दुरबुडे इत्यादी उपस्थित होते त्याचप्रमाणे इतर लोकांनी सहभाग घेत सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here