Home महाराष्ट्र गुड शेपर्ड स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा…

गुड शेपर्ड स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा…

109

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.26जानेवारी):– येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, देशभक्तीपर गीते, कविता, मनोगतातून आल्हाददायक वातावरण निर्माण झाले.

शिक्षिका नाजुका भदाणे यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद केले. तत्पूर्वी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर इ. ६ वी आणि ९ वी च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले, त्यांना शिक्षिका भारती तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. इ. १ ली ते १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व स्पष्ट करण्यासाठी कविता आणि मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

सर्व विद्यार्थांच्या बोलण्यातून जाणवत होते की, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे आज आपण हा दिवस साजरा करतोय. नागरिकांना हक्क – अधिकार, आत्मसन्मान, स्वातंत्र्य – समता – न्याय – बंधुता – धर्मनिरपेक्षता इ. मूल्ये तसेच जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आणि सक्षम लोकशाही या सर्व बाबींचा उहापोह या मनोगतातून झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चॉकलेट देण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या गीताने झाला.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख उपस्थित होते. कार्यक्रमात जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, प्रिया मोरे, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन नाजुका भदाणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here