✒️बीड प्रतिनिधी( नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.26जानेवारी):-कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील विविध खरेदी गैरव्यवहार तसेच बीड जिल्हापरीषद अंतर्गत आरोग्य विभागातील वेतनवाढ गैरव्यवहार प्रकरणात (S.I.T.) मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी गुरूवार रोजी “पीपीई किट “घालुन अनोखे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस ,मुबीन शेख,,बलभीम उबाळे, मिलिंद सरपते,रामनाथ खोड,किस्किंदाताई पांचाळ, कैलासचंद पालिवाल,आदि सहभागी आहेत. आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भेट देऊन निवेदन स्विकारत संबधित प्रकरणात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले .
कोरोना कालावधीत बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी व राजकीय पुढारी यांनी संगनमतानेच आरोग्य विभागातील विविध खरेदी ऊदाहरणार्थ सीसीटीव्ही,विद्युत उपकरण,सॅनिटायझर उ, ,रेमडीसिवीर इंजेक्शन,बोगस केवळ कागदोपत्रीच खरेदी दाखवून मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असून संबधित प्रकरणात वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ होत असून वरील प्रकरणात (S.I.T.) उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून खरेदीचे ऑडीट करून संबंधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.