Home महाराष्ट्र राष्ट्रीय मतदारदिनी तहसिलदार नितीनकुमार देवरे सन्मानित…

राष्ट्रीय मतदारदिनी तहसिलदार नितीनकुमार देवरे सन्मानित…

105

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.26जानेवारी):– तहसिलचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना ‘उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी’ म्हणून सलग दुसऱ्यांदा २५ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय मतदार दिनी सन्मानित करण्यात आले.

सन २०२२ मध्ये जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, तक्रारींचे निवारण, राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या विशेष कार्याबद्दल नितीनकुमार देवरे यांना उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मागील वर्षी आणि या वर्षी देखील सलग दुसऱ्यांदा गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय जळगाव यांच्याकडून आयोजित सन्मान सोहळा कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here