✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 23 जानेवारी):-इंग्रजी राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा हा समस्त देशवासीयांना नारा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस व समस्त हिंदुंमध्ये स्वाभिमानाची स्फुर्ती जागविणारे हिन्दु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबीर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना साडीचोळी वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर सत्कार हा उपक्रम औदुंबर बहुउद्देशिय पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला हा उपक्रम महानायकांच्या जयंतीदिनी राबविल्याने समस्त पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरला असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नामदेव ससाणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजयराव खडसे , कृषी शास्त्रज्ञ डॉ . विजयराव माने पूर्णेचे माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे, अॅड. संतोष जैन, तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तराव शिंदे , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश खामनेकर , माजी उपजिल्हाप्रमुख कैलास कदम, प्रा. डॉ . अनिल काळबांडे , शिवसेनेचे माजी शहरप्रमुख डॉ .अजय नरवाडे, भाजपाचे दत्तदिगंबर वानखेडे , जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सरोज देशमुख, माजी पं स सदस्या संगीता वानखेडे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी आमदार नामदेव ससाणे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडू नये असे आवाहन केले तर माजी आमदार विजयराव खडसे यांनी स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्या बाबत डॉ. विजयराव माने व शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक योगदानाबद्दल जेष्ठ विधिज्ञ अँड. संतोष जैन , म . फुले विद्यालयाचे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक प्रमोद देशमुख , डॉ . आशिष उगले, जेष्ठ पत्रकार राजेश गांजेगावकर यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावणारा विद्यार्थी विकास विकास मुळे याची भारतिय सैन्यदलात भरती झाल्यामुळे त्याचे वडील बालाजी मुळे यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला तर राज्यस्तरीय मैरॉथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविणारा सतीश मुडे , व गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुमारी अल्का कदम, संकेत राठोड , गौरी दळवी, वैष्णवी सुर्यवंशी , रुद्र गुजलवार , स्वरा नाईक , चिन्मय कदम , योगेश्वरी जाधव , आर्या कदम , अंजली आडे , तनुजा कुरमे , ओंकार कदम , शितल साठे, कार्तिक रावते , प्रतिक भंडारे , वैष्णवी जाधव यांच्यासह तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना साडीचोळी वाटप करण्यात आली . रक्तदान शिबीरासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील रक्तपेढीचे बीटीओ जयपुरीया, समाजसेवा अधिक्षक अनिल पिसे , शुभम पारधी , प्रदिप वाघमारे, दिलीप केराम , नेमाडे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचलन अरविंद ओझलवार यांनी तर आभार आयोजक वसंतराव देशमुख यांनी मानले.