✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि. 23 जानेवारी):- रोज सोमवारला भगवतीदेवी विद्यालय, देवसरीच्या भव्य प्रांगणात तथा निसर्गरम्य वातावरणात सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान व परिपाठ झाल्याबरोबर नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयातील युवातरुण नेतृत्व भागवतराव कबले यांनी स्वीकारून त्यांनी व शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन केले. व मान्यवराचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी विद्यालयातील दहावीचा आशीर्वाद कदम यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. काही शिक्षकतथा विद्यार्थ्यांनी सुभाष बाबू बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. 23 व 24 जानेवारी 2023 ला विद्यालय अंतर्गत स्नेहसंमेलना सुरुवात झाली. या संमेलनाचे उद्घाटन विद्यालयातील जेष्ठ शिक्षक दिनेश वानरे व दिगंबर माने यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रथमता हॉलीबॉलचा सामना वर्ग ९ ते १० मध्ये रंगतदार घेण्यात आला. यावेळेस प्रथम विजयी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना सन्मान मिळाला याचमु मध्ये कृष्णा कदम प्रथमेश वानखेडे अनिकेत दुगाळे ऋतिक कदम विशाल कदम स्वप्निल शिंदे अक्षय वानखेडे या गटाने बाजी मारली अतिशय चुरशीची लढत झाली. त्याप्रमाणे दोन दिवसांमध्ये लिंबू चमचा लंगडी खो खो संगीत खुर्ची वादविवाद स्पर्धा रांगोळी स्पर्धा विद्यालय अंतर्गत घेण्याचे नियोजन करण्यात आले.
या पूर्ण प्रांगणातील खेळाचे प्रमुख शारीरिक शिक्षक शेख सतार यांनी नियोजन केले. तर सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल अल्लडवार सर हे सहकार्य करत आहेत यामध्ये विद्यालयातील कर्मचारी गणेशराव शिंदे पांडुरंग शिरफुले सौ. मीनाताई कदम मॅडम अरविंद चेपुरवार भागवत जाधव यांची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसत होता. प्रत्येक वर्गाचे उर्वरित विद्यार्थी आप आपल्या वर्गाचे समर्थन करत होते. हे विशेष म्हणावे वाटते.