🔸भव्य मॅराथॉन स्पर्धा – लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी आयोजित
🔹महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धाचे सुरुवात करण्यात आली !
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.22जानेवारी):- लायन्स क्लब गोल्ड सिटी आयोजित भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, महाराणा प्रताप चौक गंगाखेड ते परभणी रोड पुढे पाच किलोमीटर या स्पर्धेचे स्वरूप होते या स्पर्धेसाठी एकूण 270 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत छगन मारुती बोंबले हा प्रथम, विष्णू विठ्ठलराव लव्हाळे द्वितीय, दत्ता आढाव हा तृतीय क्रमांक पटकावला उत्तेजनार्थ सोनाली पोले बक्षीस देण्यात आले स्पर्धकाला 5,555/- रुपयाचे प्रथम पारितोषिक जगन्नाथ तोतला यांचे फर्निचर अप्लायन्सेस, द्वितीय पारितोषिक अंबादास राठोड यांचे ओंकार बिजनेस ग्रुप 3,333/- रुपये, तृतीय बक्षीस गजानन डहाळे यांचे डहाळे ज्वेलर्स 2,222/- तर उत्तेजनार्थ 1,111/- बंडू बॉस घुले व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आले.
सर्व स्पर्धकांना माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी टी-शर्ट प्रदान केले.
● वय वर्षे ०९ या बालकाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व पाच किलोमीटर पूर्ण केले !
यावेळी मंचावर उपस्थित माननीय रामप्रभू मुंडे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, गोल्ड सिटी चे अध्यक्ष गोविंद रोडे, कॅबिनेट ऑफिसर अतुल गंजेवार, सचिव भगत सुरवसे, कोषाध्यक्ष संजय सुपेकर, जगदीश तोतला, अंबादास राठोड, गजानन डहाळे, संजय घारे, निलेश अल्लडवार, अजय बंग, आदी मान्यवर यांचे हस्ते विजेत्यांना बक्षीस – ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित प्रकाश डिकले सर, उमाकांत कोल्हे पाटील, सुभाष भारतीय सर, मारुती साळवे सर, आनंद काळे सर, प्रभाकर झोलकर बापू, सूर्यकांत बडवणे सर, संतोष टोले, अक्षय गुंडाळे, जगन्नाथ आंधळे, नाना सातपुते, सचिन पवार, गणेश ओझा, शिवम गिरी, पियुष रेवनवार, बालासाहेब यादव, मयूर कुलकर्णी, कृष्णा पतंगे, सोनूसिंह ठाकुर, डॉ.पवार सर, अजय बंग, अभिनय नळदकर, मकरंद चिनके, राहुल अय्या, आशिष देशमुख, ज्ञानेश्वर कवठेकर, संतोष गुंडाळे, डॉ.समीर गळाकाटू, राम टोले, राजू घोगरे, डॉ.पवार सर,नागेश केरकर, महेंद्र वरवडे, अभिजित चौधरी, महेंद्र कांबळे, मकरंद चिनके, चंदूशेठ गादेवार, नागेश केरकर, कृष्णा पतंगे, विठ्ठल गिराम, विठ्ठल शिंदे, अतुल सुरवसे,अथर्व रोडे,चंदू शेठ गादेवार, कल्याण आळसे, विठ्ठल गिराम, अभि सुरवसे, शैलेश पाटलवाड या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू मुरकुटे सर, प्रास्तविक गोविंदराज रोडे तर आभार भगत सुरवसे यांनी मानले !
यावेळी सर्व ट्रॅफिक कंट्रोल करणारे आमचे पोलीस प्रशासन यांचे विशेष आभार !
यावेळी स्वदेशी आखाडा & छत्रपती व्हॉलीबॉल ची सर्व टीम आणि स्पर्धेसाठी उपस्थित स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते !