🔸बोरी येथील ग्रामस्थांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या मार्फत शासनाकडे मागणी
🔹अन्यथा आंदोलनचा इशारा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.22जानेवारी):-अनेक वर्षांपासून बांधकामाधीन असलेले बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रचे काम पूर्ण होण्या अगोदरच राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र या आरोग्य केंद्रात अद्यापही नियमित विद्युत पुरवठा होत नाही शिवाय स्वतंत्र मीटर पण उलब्ध नसल्याने रुग्णांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत सोबतच त्यांच्या कडे ऊर्जा खाता सुद्धा आहेत मात्र अजूनही या आरोग्य केंद्रास नियमित वीज पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये आणि रुग्णामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
तरी प्राथमिक केंद्रात तत्काळ स्वतंत्र विद्युत मीटर लावण्यात यावे व नियमित वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी गावातील नागरिकांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
तत्काळ वीज पुरवठा न झाल्यास पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करणायाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.महेंद्र ब्राम्हणवाडे यांना निवेदन देतांना सरपंच बोरी सौ.किरणताई सुरजागडे, उपसरपंच विनोद भोयर उपसरपंच ल.बोरी, माजी उपसरपंच सौ.सुमित्राताई सातपुते, ग्रा. स. भाग्यवानजी पिपरे, अविनाश पिपरे, प्रकाशजी सातपुते, प्रफुल बारसागडे, शंकर सुरजागडे.सोबत उपस्थितीत प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नितीन कोडवते, गडचिरोली ता. काँग्रेस अध्यक्ष वसंत राऊत, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष दिवाकरजी निसार दीवरू मेश्राम सह गावकरी, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य हे जीवनावश्य घटक असून त्यात हलगरजी पना चालणार नाही, बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर स्वतंत्र वीजमीटर लावून नियमित वीज पुरवठा व्हावा याकरिता आपण स्वतः पुढाकार घेऊन सबंधित अधिकाऱ्याशी बोलणार व विजपुरवठा उपलब्ध करून देणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार व गरज पडल्यास आंदोलन करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी नागीरकांना दिले.