Home महाराष्ट्र जि.प.शाळा थोरगव्हाण येथे बाल आनंद मेळावा संपन्न

जि.प.शाळा थोरगव्हाण येथे बाल आनंद मेळावा संपन्न

129

🔹विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर अत्यानंद !..

🔸विद्यार्थ्यांचे व्यवहारीक व गणितीय ज्ञान वाढणार !… – मुख्या. महेंद्र देवरे.

✒️विशेष प्रतिनिधी(निलेश धर्मराज पाटील सर)

यावल(दि.21जानेवारी): – यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे बाल आंनद मेळावा मोठ् उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष विनोद भालेराव व प्रमुख पाहुणे गावाचे पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व पालक वर्ग व शिक्षक यांच्या समक्ष कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.सर्व विद्यार्थ्याचा व पालकांचा आंनद गगनात मावत नव्हता. मागील ४ वर्षापासून हा उपक्रम शाळेत सुरु केल्यामुळे विद्यार्थ्याना व्यावहारिक ज्ञान व गणितीय ज्ञान वाढले. विद्यार्थ्याचा व पालकांचा उत्साह व आंनद इतका असतो की सांगु शकत नाही.

त्याच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान यातच आम्हाला समाधान आहे असे पालक वर्ग म्हणाले.

याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष संदिप सोनवने सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवने, पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व सदस्य, गावातील सर्व माता व पालक वर्ग , ग्रामपंचायतील सरपंच व सर्व सदस्य ,मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश धर्मराज पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here