Home बीड गेवराई नजिक अपघात झालेल्या प्रशांतला मदतीची गरज

गेवराई नजिक अपघात झालेल्या प्रशांतला मदतीची गरज

104

🔹प्रशांत राऊतवर काकू नाना हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु

🔸उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.21जानेवारी):-मुलाच्या शिक्षणासाठी बायकोच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून ॲडमिशन घेतले अन् आता नियतीने मंगळसूत्र ही विकविण्याची परिस्थिती प्रशांत राऊत यांच्या वडीलावर आणली आहे. कारण घरची परिस्थिती नाजूक असून वडील रमेश राऊत सामान्य कुटुंबातील असून तीन मुलींचे लग्न करून पोराच्या शिक्षणा साठी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करत आहेत. मुलगा प्रशांत या वर्षी मेडिकल कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून व्यवसाय उभारणार होता परंतू प्रशांतचा गेवराई नजिक अपघात झाला असून त्यांच्या मेंदूला, छातीला व कंबरेला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला आहे तसेच एक पाय सुध्दा फॅक्चर झाला असून प्रशांत राऊतवर काकू नाना हॉस्पिटल बीड येथे उपचार सुरु आहेत. त्याला आपल्या मदतीची गरज आहे. तर गेवराई येथे मदतीसाठी फेरी काढली असून हमाल बांधवांनी दहा हजार रुपये मदत केली आहे.तरी राऊत कुटुंबाला सावरण्यासाठी शक्य तेवढी मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

मौजे बोरगाव ता. केज जिल्हा बीड येथील तरुण प्रशांत रमेश राऊत हा जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेज गढी येथे डी फार्मसी ला द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. सोमवार दि.१६ जानेवारी रोजी गेवराई येथे जात असताना गेवराई नजिक झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या मेंदूला, छातीला व कंबरेला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला आहे तसेच एक पाय सुध्दा फॅक्चर झाला असून प्रशांत राऊतवर काकू नाना हॉस्पिटल बीड येथे उपचार सुरु आहेत. तर प्रशांत सध्या मृत्यूशी झुंज देत असून त्याला तातडीने उपचारासाठी आणि यातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे आपल्या एक एक रुपये त्याला जीवदान मिळू शकते. आपण मदत आपल्या स्वखुशीने जेवढी देणे शक्य आहे तेवढी आपण देऊन सहकार्य करावे. प्रशांत राऊत हा राऊत कुटुंबाचा आधार आहे.

शेतकरी बाप लोकांसमोर मदतीसाठी हात पसरवीत आहे. तर हा क्षण पाहून डोळे पाणावल्या शिवाय राहत नाहीत. तरी आपण शक्य तेवढी मदत करुन प्रशांतला जीवदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर पेशंट विषयी माहिती साठी संपर्क 9545101314 ओम कडपे,8847742471 रमेश राऊत (प्रशांत चे वडील) यांच्याशी संपर्क करावा.

@ चौकट-
मदतीची रक्कम या नंबरवर पाठवा..
बँक खाते क्रमांक :60305962159
आयएफएससी कोड MAHB0001038
बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा गढी ता. गेवराई जि. बीड
खातेदार नाव: ओम सेवाभावी संस्था

फोन पे नंबर
9404934009
खाते नाव:- प्राजक्ता जगदीश रूनवाल
पैसे पाठवल्यानंतर स्क्रिन शॉट्स किंवा व्यवहार क्रमांक transaction नंबर खालील नंबर वर पाठवने
9545101314 ओम कडपे
9405050638 प्राजक्ता रूनवाल
8847742471 रमेश राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here