Home चंद्रपूर व्यसनमुक्ती साठी दारूबंदी आवश्यक- विजय सिद्धावार

व्यसनमुक्ती साठी दारूबंदी आवश्यक- विजय सिद्धावार

155

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.19जानेवारी):-व्यसनमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर व्यसनमुक्तीचा प्रभावी प्रसार होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने काटेकोर दारूबंदी करण्याची गरज असल्याचे मत दारूबंदीचे कार्यकर्ते विजय सिद्धावार यांनी व्यक्त केले.ते राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आनंद निकेतन महाविद्यालय, वरोराच्या वतीने आयोजित दारूबंदी व्यसनमुक्ती युवक शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यसनमुक्ती आणि दारूबंदी या विषयावर श्री सिद्धावार यांनी आपले मत व्यक्त केले.

भारतीय संविधानानुसार व्यसनमुक्त समाजाचे निर्मिती करणे ही सरकारची जबाबदारी आहे मात्र सरकार व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याऐवजी समाजात दारूचा खप कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न करीत आहे दारूला राजाश्रय देत आहे आणि त्यातूनच देशभर अपराधाची संख्या वाढत असल्याचे मत विजय सिद्धावार यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी युवकालाच आता पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुरेश राठोड, प्रा. मोक्षदा (मनोहर) नाईक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन रोशन गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक नन्नावरे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here