Home चंद्रपूर कवी लक्ष्मण खोब्रागडे यांचा अ.भा.साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्यावर बहिष्कार

कवी लक्ष्मण खोब्रागडे यांचा अ.भा.साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्यावर बहिष्कार

202

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.19जानेवारी):-साहित्यातून संस्कृती आणि भाषेचे संवर्धन व्हावे , त्यासाठी साहित्यिकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारचे करोडो रुपयांचे अनुदान घेऊन साहित्य संमेलन आयोजित केल्या जाते . पण अनुदान सरकारी असले तरी आयोजन खाजगी असल्याने त्यात विषमतेची बीजे पेरली जातात , याची प्रचिती अनेकांना आलेली आहे .

नुकतेच ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे आयोजित केले असून , त्यात कविकट्ट्यावर झाडीबोलीचे कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या कवितेची निवड झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले . पण त्या पत्रातील आशय वाचून संतप्त भावना व्यक्त करीत लक्ष्मण खोब्रागडे यांनी कविकट्ट्यावर बहिष्कार टाकला आहे .

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवींना मानधन , प्रवास भत्ता , निवास , भोजन व इतर सोइ देय असून कविकट्ट्याच्या नावाखाली गर्दी जमा करायला बोलावलेल्या कवींकडून भोजन व निवास सोईच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली करून एका प्रमाणपत्रावर बोळवण केली जाते .

यावर रोष व्यक्त करीत लक्ष्मण खोब्रागडे यांनी आयोजकांना विचारणा केली असता , कोणतेही उत्तर मिळाले नाही . त्यामुळे साहित्यक्षेत्रातील या विषमतावादी वागणुकीचा धिक्कार करीत लक्ष्मण खोब्रागडे यांनी या साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्यावर बहिष्कार टाकलेला आहे .

शासन जरी उदात्त हेतूने संमेलनासाठी अनुदान देत असला ,तरी ही साहित्यिकांना मिळणारी अस्पृश्यत्वाची वागणूक आणि दुजाभाव मिटवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे ठरवायला हवीत , म्हणजे आयोजकांकडून कोणालाही गौनत्वाची वागणूक न मिळता सरकारी अनुदानातून निरपेक्ष उद्देश साध्य होईल . असाही विश्वास लक्ष्मण खोब्रागडे यांनी व्यक्त केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here