Home धार्मिक  मेंडकी येथे भव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धचे आयोजन

मेंडकी येथे भव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धचे आयोजन

135

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 19 जानेवारी):-वंदणीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुन्यतिथी प्रित्यर्थ श्री गणेश संगीत भजण मंडळ मेंडकी यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय भजण स्पर्धेचे आयोजण दि. 28 व 29 जानेवारी ला मेंडकी येथिल महात्मा फुले सभामंचाच्या सभागृहाच्या मंचावर केले जात असुन भजण स्पर्धा ही पुरूषगट तसेच महिला व बालगट अश्या दोन गटाकरीता आहे.

पुरूष गटाकरीता प्रथमबक्षिस 11001/- दुसरे बक्षिस 9001/- तिसरे 7001/- चौथे 5001/- पाचवे 4001/- सहावे 3001/- सातवे 2001/- महीला व बालगटासाठी प्रथम बक्षिस 5001/- दुसरे बक्षिस 4001/- तिसरे 3001/- चवथे 2001/- पाचवे 1001/- अशी एकूण बारा रोख बक्षिसे असुण उत्कृष्ठ गायक , ह्ममौनियम वादक, तबलाचादक, खंजेरीवादक यांनासुद्धा वैयक्तीक रोखबक्षिसे दिले जाणार आहेत.

स्पर्धाचे उद्घाटन दुपारी 12 वाजता होणार असुन भजण स्पर्धाचे उद्धाटण मा. थानेश्वरजी कायरकर प्रशासक कृषी ऊ. बा. स. ब्रम्हपुरी तर सहउद्घाटक म्हणुन ब्रम्हपुरी तालुका भाजपाध्यक्ष मा. अरूणजी शेंडे व राजेद्रंजी तुंबेकर व वंदणाताई शेंडे भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा तसेच मेंडकीच्या सरपंचा मंगलाताई ईरपाते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मेंडकीचे माजी सरपंच प्रा. यशवंतभाऊ आंबोरकर तर प्रमुख अतिथी म्हणुन आदी मान्यवर मंडळी राहणार आहेत. दोन दिवसीय आयोजीत भजण स्पर्धेत परिसरातील भजण मंडळाणी स्पर्धेत सहभागी होऊण आपआपली सेवा दयावी असे आवाहन श्री गणेश संगीत भजण मंडळाचे अध्यक्ष संजय आंबोरकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here