✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 19 जानेवारी):-सन 2020 मध्ये ब्रम्हपुरी येथील बलात्कार व पोक्सो प्रकरणातील आरोपीला सत्र न्यायालयाने दिनांक 18/01/2023 रोजी 5 वर्ष शिक्षा देवुन 3,000/- रुपये आर्थिक दंड दिलेला आहे.
दिनांक 20/06/2020 रोजी ब्रम्हपुरी येथील आरोपी नामे सचिन जयवंत उर्फ सुधाकर बगमारे वय 34 वर्ष याने अटकपुर्वी यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हि घराचे अंगणात खेळत असतांना तिला कडेवर उचलून घेवुन जात असतांना फिर्यादीने त्यास हटकले तेव्हा आरोपीने तिला चॉकलेट घेवुन देतो म्हणुन पिडीत मुलीला घेवुन गेला तसेच फिर्यादी हि आरोपीच्या घरी जावुन पिडीत अल्पवयीन मुलीला घरी आणुन आरोपीने तुझ्यासोबत काय केले असे विचारले असता पिडीत मुलीने सांगितले प्रमाणे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट व पिडीतचे मेडीकल रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप.क्र.298/2020 कलम 376 (1) (अ), 376 (अब), 363 भादवि सहकलम 8.10 पोक्सो कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले. सदर प्रकरणात संपरीक्षेअती मा. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायदान्वये गुन्हयात दोषी ठरवुन 5 वर्ष शिक्षा व 3,000 रुपये आर्थिक दंड दिलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन महिला सहा पोलीस निरीक्षक पुनम पाटील पो.स्टे. ब्रम्हपुरी यांनी केलेला असुन कोर्ट पैरवी अधिकारी पो. हवा रामदास कोरे बॅ.न. 414 पो.स्टे. ब्रम्हपुरी यांनी दोषसिध्दीसाठी मोलाचे सहयोग केलेले आहे.