🔸पुसद वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. शिवाजी खराटे तर सचिव म्हणून ॲड. गोपाल मस्के
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.18जानेवारी):-वकील संघाच्या कार्यकारणी निवडीसाठी पार पडलेल्या आजच्या निवडणुकीमध्ये ॲड. शिवाजी खराटे यांची अध्यक्षपदी तर ॲड. गोपाल मस्के यांची सचिव पदी निवड करण्यात़ आली आहे. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पुसद वकील संघाची कार्यकारणी गठीत करण्याच्या दृष्टीने 17 जानेवारी 2023 रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली होती.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ॲड शिवाजी खराटे ॲड वीरेंद्र राजे व ॲड अर्जुन राठोड उभे होते त्यांच्यासाठी 17 जानेवारीला मतदान पार पडले आणि मतमोजणी सुद्धा झाली. पुसद वकील संघाच्या 190 सदस्यांपैकी 181 जणांनी मतदान करण्यात आंले.यामध्ये ॲड. शिवाजी खराटे यांना 71 मते, तरॲड. वीरेंद्र राजे यांना 53 तर ॲड अर्जुन राठोड यांना 55 मते पडली. मतदाना नंतर निकाल घोषित करताना निवडणूक निर्णय अधिकारी ॲड .ए. ए. खान यांनी ॲड. शिवाजी खराटे यांना इतर उमेदवारापेक्षा मतदान जास्त झाल्याने त्यांची अध्यक्षपदासाठी निवड झाल्याचे घोषित केले. तसेच पुसद वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ॲड. भारती शामसुंदर, सचिव म्हणून गोपाल मस्के, तर कोषाध्यक्ष म्हणून अभिमान खैरमोडे यांची यापूर्वीच अविरोध निवड झाली होती अशा प्रकारे पुसद वकील संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट अझहर खान यांनी जाहीर केले.
यावेळी पुसद वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड मनोज घाडगे व सचिव संजय राठोड यांनी पदभार नियुक्त अध्यक्ष सचिवांना देत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच लायन्स क्लब ऑफ पुसद सिटी चे माजी अध्यक्ष ऍड. शिवाजी खराटे यांची पुसद वकील संघाच्या अध्यक्षपदी व ऍड. गोपाल मस्के यांची सचिव पदी निवड झाल्याबद्दल दोघांचाही सदभावना मंच तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी ऍड. भारत जाधव , ऍड. नयर खान , अभिजित पानपट्टे हजर होते.