Home महाराष्ट्र इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय धरणगांव येथे जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा !….

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय धरणगांव येथे जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा !….

81

🔹महिला मुक्ती दिन व जिजाऊ जन्मोत्सव चे औचित्य साधून सत्यशोधक समाज संघाच्या वतीने प्रश्नमंजुषाचे आयोजन !…..

🔸१०० मुला – मुलींनी प्रश्नमंजुषात नोंदविला सहभाग !….

✒️विशेष प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.18जानेवारी)::- इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महिलांना शिक्षणाचा स्वर्ग खुला करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव यांच्या जयंती उत्सवाच्या औचित्याने “बालिका दिन”, “महिला मुक्ती दिन” व जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ एस एस पाटील मॅम होते. महिला मुक्ती दिन व जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा समन्वयक तथा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत १०० मुला – मुलींनी सहभाग नोंदवला.

३० गुणांची महामातांच्या शैक्षणिक – सामाजिक, जीवनकार्य यावर प्रश्नमंजुषा चे आयोजन केले होते.याप्रसंगी शाळेचे सचिव आबासाहेब सी के पाटील, प्राचार्य सौ एस एस पाटील मॅम, पर्यवेक्षक ए एस पाटील तसेच विभाग प्रमुख एस एन चौधरी, जि पी चौधरी, एस बी पाटील, पी सी पाटील, एस ए शिरसाठ, भूषण पवार, एस ए सूर्यवंशी, डी बी बोरसे, कांता पाटील, पवार मॅम, गावित मॅम, विकास सोनवणे सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विद्यालयाचे प्रा.सुनील देशमुख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here