✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खामगांव(दि.17जानेवारी):- बुलढाणा जिल्ह्यात प्राणी मात्रा सेवेमध्ये सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाऊंडेशनच्या श्रीराम भक्त बजरंगी भक्तांनी तालुक्यातील पिं. राजा रोड स्थित एक मोठे वानर आस्मिक मृतमुखी दिनांक १६ रोजी दुपारी पिंपळगांव राजा भंडारी रोडस्थित एका शेतामध्ये मृत्यु अवस्थेत जमिनीवर पडलेले होते.
घटनेची माहिती एकनिष्ठा फाऊंडेशनला मिळताच जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र मच्छरे यांनी पिं. राजा येथील आपले सहकारी गोपाल टप, गोलू आमले, गोपाल सातव, गौरव टवलारकर, शुभम माकोडे, राहुल उगले, भिका बोंबटकार, ओम इंगळे, अनिल चव्हाण यांच्यासह आदि श्रीराम बजरंगी भक्त यांना घेऊन मृत झालेल्या वानराची पुजा अर्चना हिंदु रिती रिवाजा नुसार अत्यंविधी मालार्पण मोठा खड्डा करून भावपुर्ण श्रध्दांजली एकनिष्ठा प्राणी मात्राच्या सेवकांनी दिली. अशी माहिती सागर धांदू यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.