🔸छत्रपती शिवाजी महाराज भव्य शंकर पट,पाच लक्ष एक हजाराची जगी लुट
🔹स्व. उत्तमराव रामचंद्र देशमुख यांच्या स्मृतिपित्यर्थ
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.17जानेवारी);-स्व. उत्तमरावजी रामचंद्र देशमुख सर यांच्या स्मृतीपित्यर्थ, छत्रपती शिवाजी महाराज भव्य तीन दिवसीय शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे.
की गेल्या काही वर्षांपासून पुष्पांवती नगरीमध्ये शेतकऱ्यांचा मैदानी खेळ बैलगाडी शंकर पट हा बंद होता. मात्र, काही दिवसांपूर्वी या खेळाला रीतसर न्यायालया मार्फत परत परवानगी मिळाली. म्हणून सर्व नियमाचे पालन करून बैलगाडीचा भव्य तीन दिवसीय शंकरपट दिनांक १८,१९,२० जानेवारी २०२३ बुधवार वेळ सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत चिंतामणी देवस्थान मैदान काकडदाती पुसद येथे होणार आहे.
या स्पर्धेचे म्हणून उद्घाटक यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे राहणार आहेत. या बैलगाडा शर्यतीचे आयोजन गौरव संतोष देशमुख मोती नगर पुसद यांनी केले आहे. तर या शर्यतीचे बक्षिसे एक लाख एक हजार (१,०,१०००) रुपया पासून ते विविध लक्ष रुपयाची बक्षिसांची क्रमवारी असून या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक व आयोजक म्हणून सुधीर उत्तमराव देशमुख लाभले आहे करीता आयोजकामार्फत पुसद तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करण्यात येत आहे की या शेतकऱ्याच्या मैदानी खेळ शंकर पट शर्यतीचा सर्वांनी आनंद घ्यावा.
चौकट……..
बैलगाडी शर्यतीसाठी मान्यवरांच्या कडून या स्पर्धेसाठी १ लाख १०००. हजाराची रुपयाची जंगी लूट केली जाणार आहे. या स्पर्धेदरम्यान काडी पुरानी बंद, खो बंद, जिवीत्वाची जबाबदारी ज्याची त्यावर राहणार आहे. यात पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहणार आहे बैलगाडी स्पर्धा ही न्यायालयाच्या सर्व नियमाला धरून असणार आहे नियमाचे व अटीचे पालन करावे लागेल. याची नोंद सहभागी शेतकऱ्यांनी घ्यावी.