Home महाराष्ट्र सरकार चालवणे शहाण्याचे काम आहे!

सरकार चालवणे शहाण्याचे काम आहे!

135

उर्फी एकटी नाही.तिच्यासोबत खूप मोठी टिम काम करीत आहे.तिला असे करण्यात पुर्ण मदत केली जात आहे. पैसा, कायदा, सुरक्षा असे सर्वच स्तरावर. अन्यथा तिने एकटीने इतके साहस केलेच नसते.तिचे कपडे, हावभाव,लोकेशन, कमेंट,ट्विटर असे सर्वच प्रायोजित आहे.
अर्थात चित्रा वाघ यांचे ओरडणे योग्यच आहे.जर मुली असे नंगानाच करीत असतील तर समाजाने आणि सरकारने महिलांचे संरक्षण तरी का करावे?महिला दाक्षिण्य तरी का दाखवावे?महिलांना संरक्षणाची गरज आहे काय?महिलांच्या आरोपावरून पुरूषांना सरसकट गुन्हेगार ठरवणे योग्य आहे काय?निव्वळ आरोपावरून पुरूषांचा समाजात, पोलिसात , कोर्टात छळ किंवा बदनामी करण्याची गरज आहे काय?
जर कोणा कमजोर बालक, महिला, पुरूष ,प्राणी वर अत्याचार होत असेल तर संरक्षणाची गरज आहेच. पण केवळ महिला म्हणून केवळ प्राणी म्हणून तसे करणे चुकीचे नाही काय? बिवट्याने दोन बालकांचा जीव घेतला. बालकांच्या बापाने बिबट्याला मारून जखमी केले.

म्हणून वन्यपशू संरक्षण कायद्यानुसार बापाला शिक्षा!
महिला व बालकांवर, प्राण्यावर अत्याचार होत होता. काही दुष्ट, दुर्जन, हैवान, सैतान करीत असतील ही. पण म्हणून सर्वच पुरूष सरसकट तसे करतात ,असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहेच.उलट मी ठामपणे सांगतो कि, प्राणीमात्रावर दया करा, महिलांचे शोषण करू नका. बालकांंचे शोषण करू नका. कुपोषित ठेवू नका, असा विचार करूनच ही कुटुंबव्यवस्था बनवली, समाजव्यवस्था बनवली, धर्मव्यवस्था बनवली. यांचे संरक्षणासाठी , संवर्धनासाठी कायदे सुद्धा पुरूषांनी बनवले. तर मग अत्याचार थांबवण्यासाठी कि वाढवण्यासाठी? तरीही पुरूषच सरसकट गुन्हेगार कसा? असे कसे म्हणता येईल? काही प्राणी चावतात. काही मांस खातात. काही प्राणी रक्त पितात म्हणून माणूस सर्वच प्राण्यांपासून दूर राहात नाहीत. उलट अधिकतम प्राणी हेच माणसांच्या आश्रयाला राहून जगतात. माणसेच त्यांचेवर माणसापेक्षा जास्त प्रेम करतात.

उर्फी,राखी किंवा तत्सम महिला सिनेमा चा गैरफायदा घेऊन समाजाची चौकट मोडीत काढत आहेत.केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशाने.त्यांचे कौतुक करणारे आंबटशौकीन त्यांची वारेमाप स्तुती करतात. त्यांच्या मतलबाने. पण यामुळे सारा समाज बिघडवला जातो.नाटकात, सिनेमात खरे तर एखादा मुद्दा सोपा करण्यासाठी, संदेश देण्यासाठी बेडरूम सीन, संभोग किंवा तत्सम कृती करण्याची गरज नसते. पण आंबटशौकीन लोकांना तेच आवडते याचा विचार डोक्यात ठेवून जबरदस्तीने तसे दृष्य घुसडले जाते. हटकून दाखवले जातात.एक माणूस आणि एक बाई आत जाऊन दरवाजा बंद केला किंवा दिवा विझवला तरी पुरेसे असते. पण अनुभव, डर्टी पिक्चर दाखवण्याची गरज काय? फक्त पैसा.आता उर्फी किंवा तत्सम कोणी महिला किंवा पुरुष असे वर्तन करीत असतील तर, ते काही समाजाच्या हितासाठी, धर्माच्या हितासाठी किंवा संस्कृती टिकवण्यासाठी करीत नाहीत.फक्त पैसा.जसे राजकीय माणसे सेवेसाठी राजकारण करीत नाहीत.फक्त पैसा.

उर्फी जे करीत आहे ते काही चित्रा वाघ यांची शत्रू आहे म्हणून करीत नाही.पण तिने तसे केल्याने चित्राला चीड येते.ती पुन्हा काहीतरी ओरडते.ही पुन्हा तिला वाकुल्या दाखवते.असाच प्रकार दोन शेजारणींमधे चालतो.दोघांच्या घराच्या भीतीला एक साने असते.त्यातून एक ढुंकून पाहाते.तर दुसरी त्या संधीचा फायदा घेऊन अंगुठा दाखवते.पहिली चीडते.ओरडते.असा प्रकार एका वयस्कर समंजस काकाने पाहिला.तर हा प्रकार बंद करण्यासाठी मातीचा गोळा आणला आणि त्या भींतीच्या सामन्यात बोळा घातला.साने बंद,पाहाणे बंद,ओरडणे बंद,भांडण बंद.उर्फी आणि चित्रा यांच्यातील हा कलगीतुरा बंद करण्यासाठी पेपर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे साने गोळा मारून बोळा घालून बंद करावे लागेल.महिला किंवा पुरुष असे कोणीही नग्न, अर्धनग्न,भिबीत्स ,अश्लील जाहिरपणे दाखवत असेल, प्रदर्शित करीत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे. यालाच तर सेन्सार म्हणतात. यालाच तर सरकार म्हणतात. यालाच तर समाज म्हणतात.यालाच तर धर्म म्हणतात. यालाच तर संस्कृती म्हणतात.पण समाजसेवक, धर्ममार्तंड, राजकारणी लोकांच्या कुटुंबात ,घरात सुद्धा असे प्रकार होत असतील तर बाहेरील गैरवर्तनावर बंदी घालण्याचे नैतिक बळ त्यांच्यात उरत नाही.ते नैतिक बळ येथे अपुरे पडते.

सरकार चालवणे शहाण्याचे काम आहे!
ऐरागैरा येड्या गबाळ्याचे नोव्हे!!

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here