✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.15जानेवारी):-देशातील तसेच राज्यातील आकडेवारी पाहता शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक परिस्थिती, कोरडा दुष्काळ, माराठवाड्या सारख्या भागात अतिृष्टीमुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. 2021 मधील देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पैकी एकट्या महाराष्ट्रात 37% आत्महत्या झाल्या . 2001 – 13 या 12 वर्षात राज्यात 2113 आत्महत्या झाल्या तर 2014- 22 या 8 वर्षात 8318 आत्महत्या झाल्याचे दिसून आले म्हणजेच प्रतिवर्षी सरासरी 1039 आत्महत्या . नापिकी,दुष्काळ,पिकाला भावं,घरातील मुलांचे शिक्षण,लग्न इत्यादी कारणांमुळे शेतकरी खचून जातो व शेवटी आत्महत्या करतो . कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू असा संकल्प केला होता.
एकट्या मराठवड्यात 2022 मधे तब्बल 1 हजार च्या वर आत्महत्या झाल्या व यामधे बीड जिल्ह्यात सर्वात जास्त. तसेच 2020 मधे देशात 5579 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही आकडेवारी माहिती संसदेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली.म्हणजेच या वर्षी दरदिवशी 15 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवलं. मराठवाडा व विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. यावर शासनाने लक्ष द्यावे तसेच ठोस उपाययोजना करून व कर्जमाफी करताना, इतर योजनेतील जाचक अटी कमी करून जस्तिस्त जास्त शेतकऱ्यांना कसा लाभ देता येईल यासाठी प्रयत्न करावे.