🔸आमदार चषक पेठ वार्ड ब्रम्हपुरी माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.15जानेवारी):- जय बजरंग क्रिकेट क्लब ,ब्रम्हपुरी तर्फे आमदार चषक पेठवार्ड ब्रम्हपुरी भव्य रात्रकालीन टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम क्रमांक पारितोषिक मनिष क्रिकेट क्लब एरोली नागपूर यांनी प्राप्त केले.तर द्वितीय क्रमांक जय बजरंग क्रिकेट क्लब प्रमुख व द्वितीय क्रमांक स्वर्गीय अजय क्रिकेट क्लब कुरुड यांना देण्यात आला. बक्षीस वितरक तथा सत्कारमूर्ती माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून खेमराज तिडके तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी,अतिथी म्हणून महेशभाऊ भर्रे सभापती तथा नगरसेवक न.प.ब्रम्हपुरी, सुमीतभाई,सोनू उर्फ प्रभाकर नाकतोडे सरपंच ग्रामपंचायत उदापुर तथा अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, सोनू मेश्राम सरपंच सोनेगाव, सोनूभाऊ गेडाम, अनंताजी उरकुडे,पत्रकार गोवर्धन दोनाडकर,अनिल उपासे, संभाजी ढोगे,लोमेश तोंडरे,व अन्य मान्यवर उपस्थित होते. आमदार चषक पेठ वार्ड ब्रह्मपुरी भव्य रात्र कालीन टेनिस बॉल हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी पेठ वार्ड च्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. आपल्या वार्डातील नगरसेवक दमदार ,व अभ्यासू असल्यामुळे त्यांना कोणता प्रकारचा त्रास होत नाही.
त्यांच्या पाठीमागे मी नेहमीच विकासाचा हात ठेवला आहे व पुढेही ठेवीन. तसेच आपल्या वार्डातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम आम्ही लवकर सुरू करणार आहोत. आपल्या वार्डातील विकासाला निधी नेहमीच उपलब्ध करून देणार म्हणून ठाम पणे मत व्यक्त केले.सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप राऊत तर संचालन व आभार भास्कर उरकुडे यांनी केले. भव्य रात्रकालीन टेनिस बॅल हाप पिच क्रिकेट स्पर्धेचे(आमदार चषक पेठ वार्ड)स्पर्धेचे आयोजन नियोजन सभापती तथा नगरसेवक महेशभाऊ भर्रे यांनी केले. स्पर्धा यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप उरकुडे, धम्मदीप गेडाम, अभिषेक रोहनकर,कुणाल भगत, कुणाल उरकुडे,कुष्णा भर्रे ,शुभम, महिंद्र, विकास ठाकरे, परिमल उरकुडे, संदेश उरकुडे, अंश हजारे, मिलिंद गोंगल, माधव उरकुडे,उमेश राऊत, कुष्णा राऊत,स्नेहल लेनगुरे,प्रशिक वाघमारे, कन्हैयासिंग भुरानी ,अजयसिंग भुराणी, प्रमोद कुथें, मनीष कुथें, प्रशांत उरकुडे, विशाल राऊत आकाश ढोरे, प्रजल कुथें, गणेश वकेकार ,अमित कुथे व पेठ वार्ड वार्डातील युवक यांनी मोलाचे सहकार्य केले.