Home Breaking News छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

157

🔸बायपास नसल्यामुळे वांरवार होत आहेत आपघात

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.15जानेवारी):-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी सायंकाळी सायकलने घरी जात असलेल्या एका युवकाला ट्रकने समोरून धडक दिल्याने युवकाचा चाका खाली येऊन दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेख अन्सार शेख गुलाब राहणार वसंत नगर असे मूर्तक युवकाचे नाव आहे. अन्सार रोजमजुरी करत होता. सायंकाळच्या सुमारास अन्सार सायकलने आपल्या घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रॅक क्रमांक एम.एच २६ -बीइ ९८३९ या १४ चाकी ट्रकने समोरून धडक दिल्याने चाकाखाली येऊन अन्सार चा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्यामुळे छत्रपती शिवाजी चौकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

काही काळापूर्ती ट्रॅफिक जाम होऊन बघणार- यांनी एकच गर्दी केली व पोलीस प्रशासनाच्या निषेध व्यक्त केला. योग्य वेळी पोलीस प्रशासनाने तात्काळ परिस्थिती हाता बाहेर न जाऊ देता आटोक्यात आणली. ट्रेक चालकाला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here