🔹जिजाऊ- विवेकानंद जन्मोत्सव: विद्यार्थ्यांनी व्यक्त केले विचार..!!
✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागभीड(दि.14जानेवारी):-सरस्वती ज्ञान मंदीर, नागभीड येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला…कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहा.शिक्षिका किरण वाडीकर,सहा.शिक्षक पराग भानारकर,सतीश जीवतोडे यांची उपस्थिती होती..राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली..
विद्यार्थ्यांनी आपल्या विचारातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.. यावेळी प्रमुख अतिथी सहा.शिक्षिका किरण वाडीकर मॅडम,सहा.शिक्षक पराग भानारकर,सतीश जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर अध्यक्ष स्थानावरून शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे यांनी मार्गदर्शन करतांना जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात रुजवावे असे मत व्यक्त केले…!!यावेळी भावना राऊत,अंकिता गायधने मॅडम,श्रद्धा वाढई मॅडम यांची उपस्थिती होती..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षका आशा राजूरकर मॅडम यांनी केले तर आभार पुजा वीर मॅडम यांनी केले..!!!