✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.12 जानेवारी):- रोज गुरूवारी भगवती देवी विद्यालय, देवसरीच्या भव्य प्रांगणात निसर्गमय वातावरणात अशोकवृक्षाच्या छायेखाली साडेअकरा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल अल्लडवार तर प्रमुख पाहुणे गणेशराव शिंदे सौ. मीनाताई कदम मॅडम यांनी स्वीकारले. मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर जिजाऊच्या वेशभूषेत समृद्धी शिंदे कोमल वानखेडे राधिका वानखेडे राशी शिंदे साक्षी काळबांडे दुर्गा शिंदे कांचन कदम यांनी अतिशय बहारदार वेशभूषेमध्ये शाळेत प्रवेश केला.
सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या जिजाऊ विद्यालयाच आकर्षण ठरल्या गेल्या तर प्रथमता स्वागतगीत सुवर्णमाला चव्हाण व विद्याराणे यांनी गायन केले. तर जिजाऊच्या जीवनावर कोमल वानखेडे राधिका वानखेडे राशी शिंदे समृद्धी शिंदे दुर्गा शिंदे यांनी विचार मांडले तर विशेष वैष्णवी कदम माता जिजाऊच्या जीवनावर गीत गायन केले. आदित्य कदम यांनी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल आपले विचार व्यक्त केले. विशेषतः त्याचा वाढदिवस सुद्धा याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा केला. अस्मिता देवसरकर यांनी स्त्रीभ्रूणहत्या वर विचार मांडण्याचा प्रयत्न केला. ओमकार माने वैष्णवी दोडके हिने तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर गीत गायन केले. अंबिका पांचाळ यांनी सुद्धा अलंकारिक भाषेत आपले मनोगत व्यक्त केले. समीक्षा राणे मुलींनी स्वामी विवेकानंदा बद्दल सखोल माहिती दिली. विद्या शिंदे अंकिता शिंदे छत्रपती शिवाजीवर पोवाडा सुंदर असा गायन केला. सानिका गंगाधर शिंदे यांनी शिवरायांचे विचार व्यक्त केले. दिव्या देवसरकर संजीवनी राणे स्त्रीने आपले कर्तृत्व व शक्ती ओळखावी सुप्रिया बोडके जिजामातेवर पोवाडा गायन केला. तर विद्यालयाचे कुशल कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे यांनी जिजामातेवर जगात सन्मान करणार कर्तव्यनिष्ठ आई म्हणून ओळख आपली निर्माण केली.
प्रत्येक आईने आपल्या गर्भधारणेपासून आपल्या बाळावर संस्कार करावे. त्याचबरोबर युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.हिंदू धर्माची माहिती जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर गणेशराव शिंदे (इतिहासाचे गाढे अभ्यासक) यांनी जिजाऊ बद्दल विचार मांडले देव मानू नका त्यांना ते महापुरुष होते. सरांनी विस्तृत माहिती दिली. तर अध्यक्षीयभाषण अतिशय बहारदार शब्दांमध्ये स्वामी विवेकानंदाबद्दल त्यांनी विशेष विचार व्यक्त केले. त्यांचा आदर्श तुम्ही आम्ही सर्वांनी घेतला पाहिजे. असे ते म्हणाले तर ज्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली विचार मांडले त्यांचे अध्यक्ष महोदयांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक दिनेश वानरे दिगंबर माने शेख सतार मारुती महाराज अरविंद चेपुरवार भागवत जाधव यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे विस्तृत असं संचलन चारोळ्याच्या कवितेच्या भारदार शब्दरचनेतून धनश्री देवसरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यालयाची तोफ झाशीची राणी कु. सुप्रिया बोडके यांनी अतिशय कडक आवाजात उत्तम प्रकारे आभार प्रदर्शन केले.
रोहन कदम यांनी जिजाऊ वंदना म्हणून सर्वांचे मन जिंकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कार्यक्रमाचा समारोप अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.